जे विरोधकांची मोट बांधत होते त्यांचीच बोट फुटली; राष्ट्रवादीतील बंडानंतर CM शिंदेंचा पवारांना टोला

जे विरोधकांची मोट बांधत होते त्यांचीच बोट फुटली; राष्ट्रवादीतील बंडानंतर CM शिंदेंचा पवारांना टोला

कोल्हापूर : आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात मोट बांधण्यासाठी विरोधकांची पाटण्यात बैठक झाली. दरम्यान, यावरूनच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांवर टीका केली. जे मोट बांधत होते, त्यांचीच बोट फुटल्याचं ते म्हणाले. (Eknath Shinde ctisize mahavikas aaghadi and shharad pawar shivsena melawa)

आज कोल्हापुरात शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्याला संबोधित करतांना त्यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. यावेळी बोलतांना ते म्हणाले, विरोधी पक्षानं कायम सरकारवर टीका केली. टीका केल्याशिवाय, त्यांना दुसरं काही सुचत नाही. रोज उठसुठ फक्त ते टीका करतात. सरकार पडेल, सरकार कोसळेल, १६ आमदार अपात्र होतील, असं रोज सांगण्यात येतं. मात्र, दिवसेंदिवस सरकार अधिक मजबुत होत आहे. आज एकनाथ शिंदेंना २२० आमदारांचं पाठबळ आहे. सरकार पडेल असं कोणत्या ज्योतिषाने विरोधकांना सांगितलं? असा सवाल त्यांनी केला.

‘सरकार आपल्या दारी अन् आम्ही दोघंही दिल्ली दरबारी’ 

सरकारने एका वर्षात अनेक निर्णय घेतले. आपलं सरकार कामं करतं. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप-सेना युतीला मोदींचा पाठिंबा आहे. मोदी सरकार राज्य सरकारचा एकाही प्रस्तावात काटछाट करत नाही. डबल इंजिनचं सरकार ज्या वेगाने काम करतंय, त्याची धडकी विरोधकांनी घेतली. एका वर्षात डबलं इंजिन सरकारचे कामे पाहून आणखी दीड वर्षात आपलं सरकार काय काय निर्णय घेईल, याची भीती विरोधकांना आहे, असं ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाने राष्ट्रवादीत बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. यावरूनही त्यांनी शरद पवारांसह विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, मोदी देशाचं नेतृत्व करू शकतात, हे अजित पवारांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी मान्य केलं. राज्य सरकारही विकासाची कामे करत आहे. त्यामुळं त्यांनी विकासाला साथ देण्यासाठी भाजप-सेना युतीला पाठिबा दिला. विरोधक वज्रमुठ सभा घेऊ लागले. पंतप्रधान मोदींच्या विरोधात बैठका घेऊ लागले. जे विरोधक पंतप्रधानांच्या विरोधात मोट बांधत होते, आता त्यांचीच बोट फुटली आहे, अशी शेलकी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

ते म्हणाले, विरोधकांनी देशाचे पंतप्रधान मोदींच्या विरोधात आघाडी केली, तेव्हा २९१४ मध्ये हिंदुत्वाचं सरकार देशात आलं. २०१९ मध्येही विरोधकांनी मोदींच्या विरोधात एकटवले होते. मात्र, विरोधी पक्षासाठी जेवढे खासदार लागतात, तेवढीही विरोधकांचे खासदार निवडणून आले नाहीत. आता तिसऱ्यांदा विरोधक मंडळी मोदींच्या विरोधात एकत्र येत आहेत. मात्र, एकत्र येऊनही ते आपल्या नेत्याचं नाव, पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवू शकत नाही, यातचं मोदींजीचा विजय असल्याचं ते म्हणाले,

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube