Download App

Rohit Pawar : राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपने वर्षभरात शिंदेंची सेना संपवली

  • Written By: Last Updated:

MLA Rohit Pawar Speak On Politics : राष्ट्रवादीमध्ये बंड करत अजित पवार यांनी शिंदे व फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेत सत्तेत सहभागी झाले. दरम्यान राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने शिवसेना व भाजपच्या आमदारांमध्ये अस्वस्था वाढली आहे. यातच आता याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. सत्तेत सहभागी करूनघेत अवघ्या वर्षभरात राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपने शिंदेच्या शिवसेनेची ताकद कमी केल्याच्या आता दिसून येत आहे, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. (rohit-pawar-With the help of NCP, BJP reduced the strength of Shinde’s army within a year)

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडाची ठिणगी पेटवली व राज्याच्या राजकारणात मोठा स्फोट झाला. तसेच त्यांच्या या मोठ्या निर्णयामुळे राष्ट्रवादी दोन गटामध्ये विभागली गेली. राष्ट्रवादीत एक अजित पवार यांचा गट निर्माण झाला तर दुसरा गट हा शरद पवार यांचा निर्माण झाला. दरम्यान शिंदे – फडणवीस सरकारशी हात मिळवणी करत अजित दादांच्या राष्ट्रवादीने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खुद्द अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आपल्या सोबतच्या नऊ आमदारांना देखील मंत्रिपद मिळवून दिले. दरम्यान त्यानंतर शिंदे गट अस्वस्थ झाला. तसेच सत्तेमध्ये राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने भाजपमध्ये देखील काहीशी नाराजी दिसून येऊ लागली आहे. यावर आता रोहित पवार यांनी वक्तव्य केले आहे.

कर्जतमध्ये एका कार्यक्रमासाठी आमदार रोहित पवार हे आले होते. यावेळी त्यांनी राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. आज गेल्या वर्षभरापासून शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून तयार आहे. मात्र राष्ट्रवादीचा नवा गट आता सत्तेत सहभागी झाला आहे. यामुळे आता एकनाथ शिंदेंची शिवसेनेची ताकद भाजपने वर्षभरातच कमी केली आहे. भाजपची ही वृत्तीच आहे कि काही झाले तरी हे लोकप्रतिनिधी यांना आपल्या जवळ करायचे व त्यांचे राजकीय अस्तित्व संपवायचे.

थेट सचिन तेंडुलकर आला बच्चू कडूंच्या रडारवर; CM शिंदेंना पत्र लिहून केली मोठी मागणी

तसेच काही पक्षांना जवळ करायचे व ठरविक वेळेनंतर त्यांचे अस्तित्व संपवायचे व आपल्या पक्षाला मोठे करायचे. यामुळे आज घडीला शिंदे गटाची परिस्थिती ही दयनीय झाली आहे. दरम्यान आता हा जो नवा गट (अजित पवार गट) आता भाजपसोबत सामील झाला आहे. त्यांची देखील राजकीय ताकद कमी करतील कि काय अशी भीती आहे.

मात्र हे सगळं सुरु असताना खुर्चीची, सत्तेची, मंत्रिपदाची व खात्यांची देखील चर्चा झाली. मात्र या सगळे सुरु असताना नागरिकांचे- जनतेचे प्रश्नांवर चर्चा कोण करणार? याबाबत कोणीच बोलत नाही. आज बळीराजा संकटात आहे, त्यांच्यावर दुबार पेरणीच संकट ओढवले आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच बेरोजगारीचा प्रश्न देखील चव्हाट्यावर आला असताना यावर कोणतीही चर्चा ही होत नाही आहे. नागरी समस्यां मोठ्या प्रमाणावर असताना या राजकारण्यांनी सत्तेसाठी जनतेला वेठीस धरले असल्याची जोरदार टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

Tags

follow us