थेट सचिन तेंडुलकर आला बच्चू कडूंच्या रडारवर; CM शिंदेंना पत्र लिहून केली मोठी मागणी

थेट सचिन तेंडुलकर आला बच्चू कडूंच्या रडारवर; CM शिंदेंना पत्र लिहून केली मोठी मागणी

मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांच्या रडारवर थेट महान क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर आला आहे. सचिन तेंडुलकरच्या एका जाहिरातीवर बंदी घालावी अशी मागणी आमदार कडू यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना एक पत्र लिहिलं आहे. सचिन तेंडुलकर करत असलेली ही जाहिरात जुगाराची असून त्याचा नकारात्मक प्रभाव पडत आहे, असे बच्चू कडू यांनी या पत्रात म्हंटलं आहे. (Bacchu kadu demand to cm Eknath shined to ban sachin Tendulkar’s advertisement)

WhatsApp Image 2023 07 15 At 12.07.35 PM (1)

WhatsApp Image 2023 07 15 At 12.07.35 PM (1)

काय म्हणाले बच्चू कडू?

महाराष्ट्र राज्यात ऑनलाईन जुगाराच्या जाहिराती सुरु असून त्यापैकी एक कंपनी पेटीयम फर्स्ट गेम या जुगाराची जाहिरात भारतरत्न श्री. सचिन तेंडुलकर करीत आहेत. श्री. सचिन तेंडुलकर हे प्रसिध्द क्रिकेटर असून भारतात त्यांचे लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत चाहते आहेत. त्यामुळे ते करित असलेल्या जाहीरातींचा परिणाम लहान थोर सर्व स्तरापर्यंत होतो व या जुगाराच्या जाहिरातीला महाराष्ट्रातील जनता बळी पडत असून त्यांचे कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त देखील होत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी बऱ्याच जणांकडून माझ्यापर्यंत प्राप्त झाल्या आहेत.

शिंदे गटातील नाराज आमदारांना फडणवीसांचा शब्द अन् अजितदादांच्या ‘अर्थ’चा मार्ग झाला मोकळा

त्यात प्रामुख्याने श्री. प्रितेश विलास पवार रा. नालासोपारा ता. वसई यांनी माझ्याकडे प्रत्यक्ष तक्रार केलेली असून त्यांनी यासाठी आझाद मैदानात आंदोलनही केलेले आहे. पेटीयम फर्स्ट गेम या ऑनलाईन जुगारावर भारतातील आंध्रप्रदेश, आसाम, नागालैंड, सिक्कीम, अरुणाचलप्रदेश, मेघालय, ओडीसा, तेलंगणा या आठ राज्यांमध्ये पूर्णतः बंदी घातली आहे. भारतरत्न सन्मानाने सन्मानीत झालेल्या व्यक्तीने अशा प्रकाराच्या जुगाराची जाहिरात करणे लोकांच्या हिताचे नाही.

पक्ष चिन्ह आणि नावाबाबत विचारले अन् अजितदादांनी पुन्हा मारला डोळा….

त्यामुळे श्री. सचिन तेंडुलकर हे भारतरत्न सन्मानित असल्याने त्यांनी भारतातील जनतेचा विचार करून अशा प्रकारच्या जाहिराती करू नये ही आपल्या देशासाठी त्यांची नैतिक जबाबदारी आहे. तरी महाराष्ट्रातील नव्हेच तर भारताची पुढील पिढी या जुगाराच्या विळख्यातून वाचवायची असेल तर या जाहिरातीवर बंदी घालण्यात यावी आणि लोकांची व त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक फसवणूक थांबविण्यात यावी, ही विनंती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube