साईभक्तांसाठी महत्वाची बातमी… संस्थानाने भाविकांसाठी घेतला मोठा निर्णय

Shirdi SaiBaba Temple : जगविख्यात असलेले शिर्डी येथील साईबाबा मंदिरात जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. दरदिवशी मोठ्या संख्येने भाविक शिर्डी येथे येत साईचरणी लीन होतात. यातच आता साईभक्तांसाठी देवस्थानाने मोठा निर्णय घेतला आहे. शिर्डी येथील साई मंदिरात जाताना भाविकांना आता हार, फुल, प्रसाद नेता येणार आहे. साई संस्थानच्या समितीने याची परवानगी देण्याचे ठरवले आहे. आता […]

Untitled Design   2023 04 22T102934.518

Untitled Design 2023 04 22T102934.518

Shirdi SaiBaba Temple : जगविख्यात असलेले शिर्डी येथील साईबाबा मंदिरात जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. दरदिवशी मोठ्या संख्येने भाविक शिर्डी येथे येत साईचरणी लीन होतात. यातच आता साईभक्तांसाठी देवस्थानाने मोठा निर्णय घेतला आहे. शिर्डी येथील साई मंदिरात जाताना भाविकांना आता हार, फुल, प्रसाद नेता येणार आहे. साई संस्थानच्या समितीने याची परवानगी देण्याचे ठरवले आहे. आता साई संस्थानमार्फत भाविकांना रास्त दरात फुलांची विक्री केल्या जाणार आहे.

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ‘दगडूशेठ’ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचा (Board of Trustees of Saibaba Sansthan) वतीने ठराव करत साईमंदिरात (Sai Mandir Shirdi ) भाविकांना हार फुल प्रसाद घेवुन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच भाविकांच्या सोयीसाठी आता साई संस्थानमार्फत भाविकांना रास्त दरात फुलांची विक्री केल्या जाणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडून खरेदी करून मंदिराच्या प्रांगणात भाविकांना फुले उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्यामुळे साई भक्तांची लूट थांबवून आता शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे.

तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने खळबळ

भक्तांची लूट आता थांबणार
दरवर्षी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी कोट्यावधी भाविक हे येत असतात. दर्शनासाठी आलेल्या भाविकाच्या श्रद्धेचा आणि भावनांचा आधार घेत व्यावसायिक तसेच विक्रेते फुल हार प्रसाद अशा पुजा साहित्याच्या माध्यमातून त्यांना आर्थिक लुबाडतात. दोनशे रुपयांची फुल माळा दोन हजार रुपयांना विकून भाविकांची लूट करतात. अशा अनेक तक्रारी साईसंस्थानला प्राप्त झाल्या होत्या. मात्र आता साई संस्थानमार्फत भाविकांना रास्त दरात फुलांची विक्री केल्या जाणार असल्याने भाविकांची होणारी लूट याला आळा बसणार आहे.

Exit mobile version