…तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने खळबळ

…तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने खळबळ

Raosaheb Danve Speek On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपासोबत जाणार असल्याचा चर्चांना उधाण आले होते. या चर्चांना पूर्णविराम होतो तोच पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पुण्यात बॅनर झळकले. तसेच अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा जाहीर व्यक्त केली. आता याच अनुषंगाने भाजप मंत्री रावसाहेब दानवे यांनी महतवाचे वक्तव्य केले आहे. अजित पवार बहुमताच्या बाजूने आल्यास राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात असे विधान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Minister Raosaheb Danve) जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 2024 ला नाही तर आताही आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर रावसाहेब दानवे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारण्यात आला होता.

अयोध्येत बस – ट्रकचा भीषण अपघात; 7 ठार तर अनेकजण जखमी

नेमकं काय म्हणाले दानवे? जाणून घ्या
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या होत्या. मात्र तरीही अजित पवार यांना मुख्यमंत्री होता आलं नाही. त्यामुळं दावा करणं आणि बहुमत असणं वेगळी गोष्ट असल्याचे दानवे म्हणाले. अजित पवार बहुमताच्या बाजूने आले किंवा दहा-वीस वर्षांनी त्यांना कदाचित बहुमत मिळालं तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात. तसेच अजित पवार हे धडाडीचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ‘दगडूशेठ’ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

शिवसेनेतून फूटून आमदार जेव्हा गुवाहाटीला गेले तेव्हा सरकारी यंत्रणांनी मदत केली असा आरोप अजित पवार यांनी याआधी केला होता. या आरोपांचे दानवेंनी खंडन केले आहे. गुवाहटीला असताना आमदारांना कोणतीही सरकारी मदत मिळाली नाही. भाजपने राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडलं नसून हेच पायात पाय गुंतून पडले त्यानंतर शिंदेंना भाजपने पाठिंबा दिल्याचं दानवें यांनी सांगितल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube