Download App

पुण्यातील साईभक्तांची श्रद्धा! साईचरणी अर्पण केला साडेचार लाखांचा सोन्याचा हार

Saibaba चा भक्त वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. त्याचबरोबर या संस्थानला मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिणे वस्तु अर्पण केल्या जात असतात.

Sai devotees in Pune give A gold necklace to Saibaba : अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबा देवस्थान हे केवळ राज्य नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे. साईबाबांचा भक्त वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. त्याचबरोबर या संस्थानला मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिणे वस्तु अर्पण केल्या जात असतात. यामध्ये पुण्यातील एका साईभक्ताने अशाच प्रकारे साईंना तब्ब्ल साडेचार लाखांचा सोन्याचा हार अर्पण केला आहे.

…म्हणून चालकानेच बस पेटवून घेतला चौघांचा बळी, हिंजवडी बस आग दुर्घटनेबद्दल धक्कादायक कारण समोर

विशेष म्हणजे कित्येक सर्वसामान्या भाविक साईंच्या चरणी भरभरून दान देत असतात. त्यात आता पुणे येथील साईभक्‍त शितल राजेंद्र गारुडकर व राजेंद्र मुरलीधर गारुडकर यांनी श्री साईचरणी ५५.७०० ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्‍याचा हार अर्पण केला. याची किंमत चार लाख ५१ हजार ८९४ रुपये आहे. हा सुंदर नक्षीकाम असलेला हार साईबाबांच्या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍याकडे सुपुर्द करण्‍यात आला.

थोडी लाज असती तर देश सोडून गेले असते… सालियन प्रकरणात रामदास कदमांची उडी ! ठाकरे पित्रा-पुत्राला घेरले

या अगोदर देखील अशाच प्रकारे दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी नवी मुंबई येथील राघव मनोहर नरसालय या साईभक्ताने साईचरणी 60 ग्रॅम वजनाचा आकर्षक आणि नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट (gold crown to Sai Baba) अर्पण केला. या मुकुटाची किंमत 4 लाख 29 हजार रुपये आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांकडून नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच तब्बल 16 कोटी 61 लाख 80 हजार रुपयांचे दान करण्यात आले आहे. हे दान 25 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत साईचरणी जमा झालं होतं.

follow us