Shirdi News : शिर्डीतील साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पी. शिवा शंकर (P. Shiva Shankar) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. शिर्डी ग्रामस्थांच्या मागणीची राज्य सरकारकडून तातडीने दखल घेत ही बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी पी शिवा शंकर यांच्या कार्यमुक्तीचे आदेश काढले आहेत. पी. शिवा शंकर यांची मागील आठ महिन्यांपूर्वीच संस्थानच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली होती.
20 Years: अर्शद वारसीच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ला पूर्ण झाली 20 वर्ष! अभिनेता पोस्ट लिहीत म्हणाला…
मागील काही दिवसांपासून शिर्डीतील ग्रामस्थांकडून अनेक तक्रारी करण्यात येत होत्या. साईबाबा संस्थानमध्ये त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. समितीमार्फत संस्थानचं कामकाज पाहण्यात येत आहे. मात्र, संस्थानच्या कामकाजात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा अधिकार समितीला नसल्याने सर्व संस्थानच्या कारभारात अडचणी निर्माण होत होत्या.
‘अॅनिमल’ चित्रपटाच्या कमाईत घसरण; 18 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमावले फक्त ‘इतके’ कोटी
समितीला अधिकार नसल्याने शिर्डी शहरात विविध विकासकामांना ब्रेक लागलेला होता. त्यामुळेच साईबाबा संस्थानमध्ये विश्वस्त मंडळाची नियुक्ती करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. नवीन विश्वस्त मंडळामध्ये शिर्डीतील स्थानिक नागरिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशीही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती.
लोकसभेनंतर राज्यसभेतही कारवाई! महाराष्ट्रातील वंदना चव्हाण, रजनी पाटलांसह 45 खासदार निलंबित
यासोबतच संस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकारी हा उपविभागीय अधिकारी असावा, अशी मागणी शिर्डीच्या ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केल्यानंतर लगेचच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची बदली करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.