‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या कमाईत घसरण; 18 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमावले फक्त ‘इतके’ कोटी

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या कमाईत घसरण; 18 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमावले फक्त ‘इतके’ कोटी

Animal Box Office Collection Day 18: रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ (Animal Movie) चित्रपटाने भारतात 500 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिस (Box Office) कलेक्शनबद्दल बोललो तर, चित्रपट आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. (Animal Box Office) जगभरात हा चित्रपट 900 कोटींचा टप्पा पार करणार आहे. मात्र, आता चित्रपटाचा वेग मंदावताना दिसत आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने 18 व्या दिवशी 5.50 कोटींचा गल्ला कमावला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Animal The Film (@animalthefilm)


या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. या चित्रपटाने सलमान खानच्या ‘टायगर 3’ आणि सनी देओलच्या ‘गदर 2’ तसेच शाहरुख खानच्या ‘जवान’चे रेकॉर्ड तोडले आहेत. सकनिल्‍कच्‍या रिपोर्टनुसार, चित्रपटाने भारतात एकूण 519. 64कोटी रुपये आणि जगभरात 835 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. चित्रपटाचे बजेट केवळ 100 कोटी रुपये असल्याचे बोलले जात असले, तरी या चित्रपटाच्या भरघोस कमाईने अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. रणबीर कपूर स्टारर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 63.8 कोटींचा व्यवसाय केला. चित्रपटाचे दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन 66.27 कोटी होते. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने 7.83 टक्के वाढीसह 71.46 कोटींचा व्यवसाय केला. चौथ्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 43.96 कोटी रुपये होते.

पाचव्या दिवशी चित्रपटाने 37.47 कोटींचा व्यवसाय केला आहे. यानंतर चित्रपटाने सहाव्या दिवशी 30.39 कोटींचा, सातव्या दिवशी 24.23 कोटींचा व्यवसाय केला आणि सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने आठव्या दिवशी 23.50 कोटींचा व्यवसाय केला. 9व्या दिवशी चित्रपटाने 34.74 कोटींची कमाई केली, 10व्या दिवशी 36 कोटींची कमाई केली आणि 11व्या दिवशी चित्रपटाने भारतात 13 कोटींचा व्यवसाय केला.

Salaar Trailer: नवा लूक अन् डॅशिंग अवतार! प्रभासच्या सालार’चा दुसरा ट्रेलर रिलीज

12व्या दिवशी या चित्रपटाने 12.72 कोटींचा व्यवसाय केला, 13व्या दिवशी 10.25 कोटींचा व्यवसाय केला आणि 14व्या दिवशीच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, ‘अॅनिमल’ ने 8.75 कोटींचा व्यवसाय केला. चित्रपटाने 15 व्या दिवशी 8.3 कोटींचा व्यवसाय केला. 16व्या दिवशी ‘अॅनिमल’ ने 12.8 कोटींचा व्यवसाय केला, तर 17व्या दिवशी 14.5 कोटींचा व्यवसाय केला आणि 18व्या दिवशी ‘अॅनिमल’ ने 5.50 कोटींचा व्यवसाय केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube