Salaar Trailer: नवा लूक अन् डॅशिंग अवतार! प्रभासच्या सालार’चा दुसरा ट्रेलर रिलीज

Salaar Trailer: नवा लूक अन् डॅशिंग अवतार! प्रभासच्या सालार’चा दुसरा ट्रेलर रिलीज

Salaar Trailer Released: या वर्षीच्या बहुप्रतिक्षित चित्रपट सालारचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. (Salaar Trailer) प्रभास (Prabhas) अभिनीत या हाय-व्होल्टेज अॅक्शन थ्रिलर चित्रपटाची चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. (Salaar Movie) चाहत्यांची उत्कंठा द्विगुणित करण्यासाठी निर्मात्यांनी आता अॅक्शनने भरलेल्या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज केला आहे.

या ॲक्शन थ्रिलर सिनेमामध्ये, प्रभासच्या अभिनयाने चाहत्यांचा मन जिंकले आहे. सिनेमातील ग्राफिक्स, ॲक्शन सीन्सने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. ‘केजीएफ’चे दिग्दर्शक प्रशांत नील आणि ‘बाहुबली’ फेम प्रभास पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्यामुळे सिनेमाबद्दलची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.

‘सालार’चा दुसरा ट्रेलर

‘सालार’च्या रिलीजमध्ये झालेल्या फेरबदलामुळे या चित्रपटाबाबत अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला होता, ज्याला चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला होता.

चित्रपटाच्या दुस-या ट्रेलरबद्दल सांगायचं झालं तर हा 2.54 मिनिटांचा ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसणार आहे. अॅक्शन आणि रक्तपाताने भरलेला ‘सालार’चा दुसरा ट्रेलर चाहत्यांचा होशांना उडवून देईल.

Advance Booking: किंग खानचा ‘डंकी’ तर प्रभासच्या ‘सालार’ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये ‘काटे की टक्कर’

‘सालार पार्ट 1’ ने रिलीज होण्यापूर्वीच खूप लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटाचे ओटीटी हक्क विकले गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे ओटीटी अधिकार 160 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. केजीएफचे दिग्दर्शक प्रशांत नील आणि प्रभास यांनी ‘सालार पार्ट 1’ मध्ये पहिल्यांदा एकत्र काम केले आहे.

हॉम्बल फिल्म्स निर्मित या चित्रपटात प्रभास व्यतिरिक्त श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू यांनी महत्त्वाच्या भूमिकेत बघायला मिळत आहेत. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ हा चित्रपटही चित्रपटगृहात दाखल होणार आहे. यामुळे या दोन सुपरस्टार्समध्ये चुरशीची स्पर्धा पाहणे रंजक ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube