Salaar Trailer: अखेर प्रतीक्षा संपली! प्रभासच्या ॲक्शन सीन्सने ‘सालार’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

Salaar Trailer: अखेर प्रतीक्षा संपली! प्रभासच्या ॲक्शन सीन्सने ‘सालार’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

Prabhas Salaar Trailer Released: प्रभास (Prabhas) स्टारर ‘सालार पार्ट 1: सीझफायर’ (Salaar Trailer) हा 2023 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर आता ‘सालार पार्ट 1: (Salaar Movie) सीझफायर’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येण्यासाठी काही दिवसच शिल्लक आहेत. जुलैमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांना खूप प्रभावित केले होते आणि आता चाहत्यांची चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

या ॲक्शन थ्रिलर सिनेमामध्ये, प्रभासच्या अभिनयाने चाहत्यांचा मन जिंकले आहे. सिनेमातील ग्राफिक्स, ॲक्शन सीन्सने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. ‘केजीएफ’चे दिग्दर्शक प्रशांत नील आणि ‘बाहुबली’ फेम प्रभास पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्यामुळे सिनेमाबद्दलची हाईप चांगलीच वाढली आहे.

‘सालार पार्ट 1’ ने रिलीज होण्यापूर्वीच खूप लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटाचे ओटीटी हक्क विकले गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे ओटीटी अधिकार 160 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. केजीएफचे दिग्दर्शक प्रशांत नील आणि प्रभास यांनी ‘सालार पार्ट 1’ मध्ये पहिल्यांदा एकत्र काम केले आहे.

Ole Aale: नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर अन् सायली संजीव यांचा ‘ओले आले’ सिनेमाचा टीझर रिलीज

हॉम्बल फिल्म्स निर्मित या चित्रपटात प्रभास व्यतिरिक्त श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू यांनी महत्त्वाच्या भूमिकेत बघायला मिळत आहेत. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ हा चित्रपटही चित्रपटगृहात दाखल होणार आहे. यामुळे या दोन सुपरस्टार्समध्ये चुरशीची स्पर्धा पाहणे रंजक ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube