Advance Booking: किंग खानचा ‘डंकी’ तर प्रभासच्या ‘सालार’ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये ‘काटे की टक्कर’

Advance Booking: किंग खानचा ‘डंकी’ तर प्रभासच्या ‘सालार’ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये ‘काटे की टक्कर’

Dunki VS Salaar Box Office: चित्रपट प्रेमींसाठी हा ख्रिसमस खूप खास असणार आहे. 21 आणि 22 डिसेंबर या दोन तारखा अशा आहेत, ज्याची चाहते ख्रिसमसपेक्षा जास्त आतुरतेने वाट बघत आहेत. कारण बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ या ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर दिग्दर्शक राजकुमार हिरानीचा पुढचा चित्रपट ‘डंकी’ (Dunki Movie) घेऊन थिएटरमध्ये पोहोचत आहे.

या खास प्रसंगी ‘बाहुबली’ स्टार प्रभास आणि ‘KGF 2’ दिग्दर्शक प्रशांत नील यांचा आगामी ‘सालार’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सोशल मीडियावर (Social media) या दोन्ही चित्रपटांची चर्चा आहे. दरम्यान या चित्रपटांचे अ‍ॅडव्हान्स बुकिंगही सुरू झाले आहे. प्री-तिकीट विक्रीत शाहरुख खानचा चित्रपट प्रभास स्टारर चित्रपटापेक्षा आघाडीवर आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये चुरशीची स्पर्धा लागल्याचे दिसत आहे.

‘डंकी’ अ‍ॅडव्हान्स बुकिंग

मनोरंजन विश्वातील अहवालांवर ‘डंकी’ आणि ‘सालार’ दोन्ही अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये जोरदार कामगिरी करत आहेत. प्रभासच्या ‘सालार’ने राष्ट्रीय साखळीत ‘डंकी’पेक्षा जास्त तिकिटे विकली आहेत. त्याचबरोबर कमाईच्या बाबतीत प्रभासचा ‘सालार’ ‘डंकी’ मागे पडला आहे. sacnilkच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानच्या ‘डंकी’ने आतापर्यंत 1 लाख 44 हजार 830 तिकिटे विकली आहेत. यासह या चित्रपटाच्या एकूण विक्रीचा आकडा 4.46 कोटींचा आकडा पार केला आहे.

Baipan Bhari Deva: ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे मुंबईत पुन्हा एकदा स्पेशल स्क्रीनिंग

‘सालार’ने किती कमाई ?

‘सालार’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगबद्दल सांगायचं झालं तर, या चित्रपटाची आतापर्यंत 1लाख 53 हजार 705 तिकिटे विकली गेली आहेत. SRK स्टाररच्या तुलनेत प्रभासच्या चित्रपटाने 8875 अधिक तिकिटे विकली आहेत, तरीही केवळ 3.58 कोटी रुपये कमावले आहेत. अ‍ॅडव्हान्स बुकिंग कलेक्शनमध्ये प्रभासचा सालार, शाहरुखच्या ‘डंकी’पेक्षा 88 लाखांनी मागे आहे. याचे मुख्य कारण म्हणजे दक्षिणेकडील राज्यांमध्ये तिकीट दरांवर घातलेले निर्बंध.

‘हे’ चित्रपट कधी प्रदर्शित होणार

शाहरुख खानचा ‘डंकी’ चित्रपट 21 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. तापसी पन्नू, बोमन इराणी आणि विकी कौशल यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केला आहे. प्रभासच्या ‘सालार’ बद्दल बोलायचे तर प्रशांत नीलने याचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात प्रभासशिवाय श्रुती हासन आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 22 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube