Animal Box Office: ‘अॅनिमल’ची बॉक्स ऑफिसवर कमाल! 17व्या दिवशीही केली छप्परफाड कमाई
Animal Box Office Collection Day 17 : अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ (Animal) हा चित्रपट रिलीज होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. यावेळी आता तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी झेप घेतली आहे. 17व्या दिवशी या चित्रपटाने उत्कृष्ट कलेक्शन करत ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘दंगल’चे रेकॉर्ड तोडले आहेत. या चित्रपटाने भारतात 500 कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे. अशा परिस्थितीत ‘अॅनिमल’ने 17 व्या दिवशी 835 कोटींचा गल्ला कमावला आणि जगभरात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत…
View this post on Instagram
Sacknilk च्या रिपोर्टनुसार, सुरुवातीचे आकडे असे आहेत की, 17 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या रविवारी ”अॅनिमल’’ ने बॉक्स ऑफिसवर 15 कोटींचा व्यवसाय केला आहे. यानंतर भारतातील चित्रपटाचे एकूण कलेक्शन 835 कोटींवर पोहोचले आहे. 17 व्या दिवशी कमाई केल्यानंतर चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन 835 कोटींवर पोहोचले आहे. यावरून एका गोष्टीचा अंदाज लावता येईल की, या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. मात्र, चौथ्या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण होऊ शकते, असे मानले जात आहे. कारण ‘डंकी’ आणि ‘सालार’ हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यांच्या रिलीजचा परिणाम ‘अॅनिमल’च्या कमाईवर होऊ शकणार आहे.
‘अॅनिमल’ने ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘दंगल’चा सिनेमाचा पराभव
‘अॅनिमल’ने भारतात केवळ 500 कोटींचा टप्पा पार केला नाही तर 17व्या दिवशी कमाईच्या बाबतीत ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘दंगल’लाही मागे टाकले आहे. ”अॅनिमल’’ व्यतिरिक्त इतर चित्रपटांच्या 17व्या दिवसाच्या कलेक्शनवर नजर टाकली तर ‘दंगल’ने 13.68 कोटी, ‘जवान’ने 11.5 कोटी आणि ‘पठाण’ने 5.75 कोटींची कमाई केली होती. अशा परिस्थितीत या आकडेवारीची तुलना संदीप रेड्डी वंगा यांच्या चित्रपटातील आकडेवारीशी केली तर ते खूपच कमी आहेत.
मात्र, ‘अॅनिमल’चे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. याआधी त्यांनी ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘कबीर सिंग’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले होते. ‘अॅनिमल’मध्ये रणबीर कपूरसोबत अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने देखील एक कॅमिओ केला आहे. ती फक्त 10-15 मिनिटांसाठी पडद्यावर येते आणि तेवढ्यात तिने एकच गोंधळ उडाला. संपूर्ण 3 तास ही अभिनेत्री पडद्यावर राहिली तरीही रश्मिका पेक्षा तृप्ती या चित्रपटाचीच जास्त चर्चा होत आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.