अहमदनगर : शिर्डीतील साईबाबांच्या चरणी नेहमीच देणगी देणाऱ्या भक्तांची रिघ लागलेली असते. यावेळी देखील हैद्राबादेतील एका साईभक्ताकडून साईबाबांच्या चरणी मोठी देणगी अर्पण करण्यात आली आहे. त्यांनी या देणगीमध्ये 310 ग्रॅम वजनाचे सुमारे 20 लाख रुपये किंमतीचा नवरत्न आणि मोती जडीत सोन्याचा हार.
त्यांनी फक्त हा सोन्याचा हारच दिला नाही तर 1176 ग्रॅम वजनाचे 31 हजार 752 रुपये किंमतीचे चांदीचे ताट, वाटी, प्लेट व ग्लास श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिले. तसेच 02 लाख रुपये देणगीचा धनादेश यावेळी त्यांनी दिला.असा एकूण 22 लाखाची सामुग्री के भुपाल यांनी साईचणी अर्पण केली आहे.
हैद्राबाद येथील या देणगीदार दाम्पत्याचं नाव साईभक्त श्रीमती आणि भुपाल कामेपल्ली यांनी त्यांचे फर्म के भुपाल इंजिनियर्स अण्ड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि. च्या वतीने त्यांनी ही देणगी शिर्डीतील साईबाबांच्या चरणी अर्पण केली आहे. शिर्डीतील साईबाबांच्या चरणी नेहमीच देणगी देणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते.
Jitendra Awhad : मी केलेली कामे झाकण्याचा प्रयत्न, आव्हाडांची शिंदे गटावर टीका
शिर्डीतील साईबाबा लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे साईबाबांच्या चरणी दानाचा ओघ सुरूच आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थान हे देशातील श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच वर्षागणिक साई संस्थानाला मिळत असलेल्या देणग्या या कोट्यवधींच्या घरात असल्याचे पाहायला मिळत आहे.