Download App

हनुमान जयंतीला पोलिसांचाही जल्लोष! समाजवादी जन परिषदेने घेतली हरकत, कारवाईची मागणी

संगमनेरमधील हनुमान जयंतीमध्ये पोलिसांनी मोठी मिरवणूक काढली. त्यावर समाजवादी जन परिषदेने आक्षेप घेत कारवाईची मागणी केली.

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Hanuman Jayanti procession in Sangamner city : नुकतीच हनुमान जयंती पार पडली. या उत्सवात शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात आनंदोस्तव साजरा केला जातो. तसंच, सर्वच स्तरातील लोक या उस्तवात मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. हनुमान जयंती निमित्ताने संगमनेर शहरात पोलिसांनी भगवे फेटे, पोलीस गणवेश अशा थाटात वाजत-गाजत मोठी मिरवणूक काढली. यामध्ये शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. मात्र, या मिरवणुकीवर आता आक्षेप घेत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. समाजवादी जन परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष वकिल निशा शिवूरकर यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.

 

Ahmednagar Lok Sabha : लंकेंच्या पाठिशी थोरात; विखेंविरोधात संगमनेरात मध्यरात्री खलबतं

मोठी मिरवणूक काढली

संगमनेर शरहात हा उत्सव विविध संघटनांकडून वर्षानुवर्षे साजरा होत आहे. ही एक पिढ्यान पिढ्या चालत आलेली प्रथा परंपरा असल्याने ती आजही मोठ्या प्रमाणात चालत आहे. संगमनेर शहरात पोलीस शहर प्रमुख मथुरे यांच्या पुढाकाराने स्त्री-पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस गणवेश परिधान करुन, भगवे फेटे बांधून हनुमान जयंतीची मोठी मिरवणूक काढली. तसंच, यामध्ये पारंपारिक वाद्यही वाजवण्यात आली. परंतु, ही मिरवणूक पोलिसांना महागात पडण्याची शक्यता आहे.

 

रामनवमी, हनुमान जयंती दंगली घडवण्यासाठी; आव्हाडांचं हिंदू सणांबाबत वादग्रस्त वक्तव्य

संविधान विरोधी

भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. संविधानाप्रमाणे प्रत्येकाला व्यक्तिगत आयुष्यात धर्मपालनाचे स्वातंत्र्य आहे. परंतु, सरकारं, सरकारी कर्मचारी यांनी कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात पदावरील पोशाख आणि कामावर असतांना अशा प्रकारे धार्मिक उत्सवात सहभागी होणं संविधान विरोधी आहे. कामावर असतांना कोणाही सरकारी, पोलीस कमचाऱ्यांचं वर्तन भारतीय नागरिक म्हणून असलं पाहिजे.

 

PUBG Game : मुंब्य्रापाठोपाठ संगमनेरमध्ये पोहचले धर्मांतराचे ऑनलाईन रॅकेट

जन परिषदेची हरकत

संगमनेर शहर पोलिसांची ही कृती संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांना धक्का देणारी आहे. अन्य धर्मियांच्या मनात पोलीस खात्या विषयी अविश्वास निर्माण करणारी आहे. ही मिरवणूक धर्मनिरपेक्ष आणि एकात्म भारताच्या मिश्र संस्कृतीला छेद देणारी आहे. तरी त्वरित दखल घेवून करवाई करावी. अशी तक्रार समाजवादी जन परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष वकिल निशा शिवूरकर यांनी केली आहे.

follow us

वेब स्टोरीज