Download App

निवडणुकीत पराभव का झाला? थोरात म्हणाले, “मला सगळ्यांवर..”

थोरातांचा पराभव राज्यात चर्चेचा ठरला. असं नेमकं काय घडलं की थोरातांचा पराभव व्हावा असा प्रश्न सगळ्यांनाच पडला.

Balasaheb Thorat : संगमनेर तालुक्याचं मागील चाळीस वर्षांपासून प्रतिनिधीत्व करणारे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा धक्का बसला. महायुतीच्या नवोदित अमोल खताळ यांनी त्यांचा दहा हजार मताधिक्याने पराभव केला. थोरातांचा पराभव राज्यात चर्चेचा ठरला. असं नेमकं काय घडलं की थोरातांचा पराभव व्हावा असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. आता या प्रश्नाचं उत्तर बाळासाहेब थोरात यांनीच दिलं आहे. नेमकं काय घडलं हे अजूनही समजत नाही. प्रत्येक जण वेगवेगळं कारण सांगत आहे असे थोरात म्हणाले आहेत.

संगमनेर येथील स्नेहसंवाद मेळाव्यात बाळासाहेब थोरातांचं एक वेगळं रुप लोकांना पहायला मिळालं. पराभवानं खचून न जाता अधिक जोमाने काम करू यासाठी मला तुमचीही साथ लागणार आहे अशी साद थोरातांनी संगमनेरकरांना घातली. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह तालुक्यातील ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

“मी स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा, लढणारच!” बाळासाहेब थोरातांनी आता ठरवलंच

थोरात म्हणाले, तुम्ही इकडे सगळे काम करत होता. मी राहता विधानसभेत प्रचाराचे काम पाहत होतो. आता नेमकं काय घडलं याचा विचार जसा तुम्ही करत आहात तसाच मी सुद्धा करतोय. तुम्ही मला चाळीस वर्ष संधी दिली. प्रत्येक निवडणुकीत मोठं मताधिक्य देत विधानसभेत पाठवलं. मी राज्यात फिरत होतो. माझा तुमच्या सगळ्यांवर विश्वास होता. पण या निवडणुकीत नेमकं काय घडलं हे आजही समजायला तयार नाही. प्रत्येक जण वेगवेगळे कारण सांगतोय. मी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतले. ज्या काही कमतरता राहिल्या असतील त्या निश्चितच दूर करू याची ग्वाही मी देतो असे थोरात म्हणाले.

थोरात पुढे म्हणाले, ‘आम्ही त्रासाला अन् धमक्यांना भीक घालणार नाही आम्ही लढणारच आहोत. आता तर काय दंड थोपटून कार्यक्रम चाललायं पाहा संगमनेरची जिरवली की नाही असं बोललं जात आहे. आम्हीही निवडणुकीत विजय मिळवला पण आता जे चाललं आहे ते दुर्देवी आहे. आमच्या अन् जनतेच्या गाफिलपणामुळे माझा पराभव झाला. हे सगंळं आम्ही दुरुस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. जनता ज्याच्या पाठिशी तोच समर्थ असतो. आपणच समर्थ राहणार आहोत घाबरायचं कारण नाही’, असा विश्वास थोरातांनी उपस्थितांना दिला.

ज्यांनी फटाके वाजवले, ते घरात माझ्या कष्टाचं पाणी पिलेत; थोरातांनी आठवण करुन दिली

follow us