Download App

राम शिंदेंपाठोपाठ अजितदादांचे आमदार जगतापांना आश्वासनांचे पाठबळ

Sangram Jagtap : राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter session) सध्या नागपुरात सुरु असून लोकप्रतिनिधी विविध प्रश्नावर सध्या सभागृहाचे लक्ष वेधून घेत आहे. यातच नगर शहराचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी देखील अहमदनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा, यासह अन्य विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

कामगारांच्या मागण्यांबाबत लवकरत लवकर निर्णय घेतला असे अजितदादांनी आमदार संग्राम जगताप यांना आश्वासित केले. दरम्यान कर्जत एमआयडीसीबाबत देखील रोहित पवार यांना शह देण्यासाठी भाजप आमदार राम शिंदे सांगतील तसंच होणार असं पाठबळ देखील अजित पवार यांनी राम शिंदे यांना दिले होते.

अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षापासून सातवा वेतन आयोगाचा प्रश्न प्रलंबित आहे. यासाठी कर्मचाऱ्यांच्या वतीने मुंबई येथे लॉंग मार्च सुरू करण्यात आला होता. त्यामुळे सर्व कर्मचारी लॉंग मार्च मध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा, यासाठी अजित पवारांकडे पाठपुरावा सुरु होता. नुकतेच्या त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली असून यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली.

ताफा अडवल्यानंतर Maratha Reservation संदर्भात खासदार विखेंनी केली स्पष्ट भूमिका, म्हणाले…

जगताप म्हणाले, लवकरच अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होईल. त्याच बरोबर सफाई कामगारांचा वारस हाकाचा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियात असून हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचा आहे, यावर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र बैठकीचे आयोजन केले जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे. तसेच अहमदनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातून सुमारे 13 किलोमीटरचे सीना नदीचे पात्र असून सीना नदीची हद्द निश्चित झाली आहे. आता सीना नदीचे पात्र मातीने भरलेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या पुराचा धोका शहरवासीयांना बसू शकतो.

धारावी प्रकल्पात घोटाळा झाला असेल तर ते पाप उद्धव ठाकरेंचं; आशिष शेलारांची टीका

संभाव्य धोका पाहता नदीचे पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण व्हावे यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार प्रस्ताव तयार केला असून त्या प्रस्तावाला मंजुरी मिळून निधी उपलब्ध व्हावा यासाठी अजित दादांना साकडे घालण्यात आले. लवकरच खोलीकरणासाठी निधी मंजूर केला जाईल, असे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री यांनी दिले आहे. खोलीकरण झाल्यानंतर पूर रेषेचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे. अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

Tags

follow us