धारावी प्रकल्पात घोटाळा झाला असेल तर ते पाप उद्धव ठाकरेंचं; आशिष शेलारांची टीका
Ashish Shelar : मुंबईतील धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे (Dharavi Slum Redevelopment Project) काम अदानी समूहाला देण्यात आलं होतं. मात्र, हे काम अदानींकडे देतांना यात टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाने धारावी बचाव आंदोलन पुकारले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा काढण्यात येत आहे. दरम्यान, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली. यावर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रतिक्रिया दिली.
प्रसिद्धी मिळाल्यानं जरांगेंच्या डोक्यात हवा, भुजबळांना मारण्याची धमकी; समीर भुजबळांचा गंभीर आरोप
आज माध्यमांशी बोलताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं. ते म्हणाले की, अडणूक आंदोलन कधी मोर्चा, मुंबईत उबाठाबाबत एकच चर्चा, धारावीतून निकालेंने मातोश्री टू का खर्चा, अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले, या टेंडरच्या अटी, कार्यपद्धतीचे आणि त्याबाबतीतील धोरणात्मक निर्णय उद्धव ठाकरेंच्या काळात झाले आहेत. अदानींना टेंडर मिळावं, यासाठी ठाकरेंनी काही विशेष अटींची तरदूद केली होती. आता टेंडरमध्ये काही गडबड असेल, टीडीआर घोटाळा झाला असेल तर त्याचं सर्वस्वी पाप उद्धव ठाकरेंचं आहे, असं शेलार म्हणाले.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाला डबल झटका; शमी, चहर आऊट
पुढं बोलतांना ते म्हणाले की, पाचशे फुटांची घरं हवी होती, मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच तेव्हा टेंडरमध्ये अट घालायची होती. तेव्हा का नाही घातली, तुम्हाला आज का उपरती झाली? मुंबईला आणि राज्याला काही विकासातून मिळाले की, ज्यांची पोटदुखी होते, ते म्हणजे उबाठा. त्यामुळं त्यांच्या पोटदुखीचा हा कार्यक्रम आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
ठाकरे गटाचा मोर्चा धारावीतून निघू नये, तो थांबावा यासाठी दिल्लीतून दबाव आहे, असा दावा संजय राऊतांनी केला. याविषयीव विचारले असता शेलार म्हणाले की, तुमच्यावर कोणाचा दबाव होता मग? तुमच्यावर शरद पवारांचा दबाव होता का? पवारांनी दिल्लीतून फोन केला होता का? असा प्रतिप्रश्न केला. राऊत काहीही बोलत राहतात. परिषदेला फक्त राऊत गांजा आणि चिलम लावूच हजेरी लावतात, अशी टीकाही त्यांनी केली.
काय आहे राऊत यांचा आरोप?
धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा होताना दिसतोय. धारावी वाचवणे म्हणजे मुंबई वाचवणे. धारावी हा पहिला घास आहे. आणि त्यानंतर मुंबई गिळंकृत करण्याचा गुजराती लॉबीचा मोठा डाव आहे, अशी टीका राऊतांना केली होती.
तर अंबादास दानवे म्हणाले की, धारावीची मालकी अदानींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. धारावीतील प्रत्येक घरात लघुउद्योग आहे. या भागाचे पुनर्वसन झाल्यास लघुउद्योगांचेही मोठे नुकसान होणार आहे. अदानी यांना टीडीआरची मालकी देऊन खोके सरकार दलालीचे काम करत असल्याची टीका दानवे यांनी केली.