दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाला डबल झटका; शमी, चहर आऊट

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाला डबल झटका; शमी, चहर आऊट

IND vs SA : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. एकदिवसीय संघाचा भाग असलेल्या दीपक चहरने (Deepak Chahar) दौऱ्यातून माघार घेतली आहे. कसोटी मालिकेतून मोहम्मद शमी (Mohamad Shami) दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. कुटुंबाच्या वैद्यकीय कारणामुळे चहरने एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी निवड समितीने आकाश दीपची निवड केली आहे. शमीबाबत आधीच स्पष्ट करण्यात आले होते की, त्याचे खेळणे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल.

बीसीसीआयने याबाबतची माहिती शेअर केली आहे. यापूर्वी दीपक चहर आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतही भारतीय संघाचा भाग होता, परंतु तो एकही सामना खेळला नाही, तो टीम इंडियासोबत आफ्रिकेत आला नव्हता. आता त्याने उद्यापासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतूनही आपले नाव मागे घेतले आहे.

अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबाबत बीसीसीआयने सांगितले की, मेडिकल टीमने शमीच्या फिटनेसबद्दल स्पष्ट सांगितलेले नाही, त्यामुळे तो 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.

Mumbai Indians ला मोठा फटका! रोहितची कॅप्टन्सी गेल्याने फॉलोअर्स घटले; चेन्नईला फायदा

दीपक चहरनंतर अशी आहे टीम इंडिया
ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, आवेश खान, अर्शदीप सिंह, आकाश दीप.

याशिवाय बीसीसीआयने सांगितले की, जोहान्सबर्ग येथे 17 डिसेंबर रोजी होणार्‍या पहिल्या वनडेनंतर फलंदाज श्रेयस अय्यर कसोटी मालिकेच्या तयारीसाठी कसोटी संघात सामील होईल. अय्यर दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीममध्ये नसणार आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये महिला संघाने रचला इतिहास, दीप्ती शर्माची घातक गोलंदाजी

एकदिवसीय मालिकेत कोचिंग स्टाफ बदलणार
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस महाम्ब्रे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप हे कसोटी मालिकेची तयारी करणार आहेत.

भारत ‘अ’ संघाचे प्रशिक्षक एकदिवसीय संघाला मदत करतील. भारत अ संघाच्या प्रशिक्षकांमध्ये फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक, गोलंदाजी प्रशिक्षक राजीव दत्ता आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अजय रात्रा यांचा समावेश असेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube