Mumbai Indians ला मोठा फटका! रोहितची कॅप्टन्सी गेल्याने फॉलोअर्स घटले; चेन्नईला फायदा

Mumbai Indians ला मोठा फटका! रोहितची कॅप्टन्सी गेल्याने फॉलोअर्स घटले; चेन्नईला फायदा

Mumbai Indians : इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) मोठा उलटफेर केला आहे. आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबईचा कर्णधार बनवण्यात आला आहे. मात्र याचा मोठा फटका या टीमला बसला आहे. कारण रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आल्यानंतर मुंबई इंडियन्सचे सोशल मिडीयावरील फॉलोअर्स घटले आहेत. त्यामुळे दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज ही टीम आता इंन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असणारी टीम ठरली आहे.

रोहितची कॅप्टन्सी गेल्याने फॉलोअर्स घटले…

इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई आणि चेन्नई या दोन टीम सर्वात यशस्वी टीम आहेत. त्यांनी 5-5 वेळा आयपीएलची ट्रॉफी पटकावली आहे. तसेच अनेकदा प्लेऑफसाठी क्वालिफाय देखील केले आहे. त्यामुळेच या दोन्ही टीम्समध्ये जोरदार स्पर्धा सुरू असते. ज्याचा परिणाम सोशल मिडीयावर नेहमीच पाहायला मिळतो. कारण या दोन्ही टीम्सच्या फॉलोअर्समध्ये चढाओढ सुरू असते.

पुणे मेट्रोला ब्रेक? येरवडा-रामवाडी स्थानके दुसरीकडे हलवा; स्थानिकांची ‘महामेट्रो’ला नोटीस

मात्र नुकतच मुंबई इंडियन्सने अधिकृत घोषणा केली की, रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबईचा कर्णधार बनवण्यात आला आहे. त्यामुळे रोहितचे आणि पर्यायाने मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज झाले आहेत. काही तासांतच मुंबई इंडियन्सचे सोशल मिडीयावरील फॉलोअर्स घटले आहेत. त्यांचे फॉलोअर्स 12.9 मिलियन झाले आहेत. तर याचा फायदा चेन्नई सुपर किंग्जला झाला आहे. त्यामुळे दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज ही टीम आता इंन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असणारी टीम ठरली आहे. त्यांचे फॉलोअर्स 13 मिलियन्स पेक्षा जास्त झाले आहेत.

CID फेम अभिनेत्रीकडून कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप; थेट व्हिडीओत दाखवले जखमांचे व्रण

दरम्यान आयपीएल 2024 पूर्वी मुंबईने पांड्याचा ट्रेड केला होता. पांड्या याआधी गुजरात टायटन्सकडून खेळत होता. पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातही चॅम्पियन झाला. हार्दिकच्या पुनरागमनामुळे त्याच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. हार्दिकची आयपीएलमधील वैयक्तिक कामगिरी पाहिली तर तो उत्कृष्ट राहिला आहे. पांड्याने आतापर्यंत 123 आयपीएल सामने खेळले आहेत. यात 2309 धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने 53 विकेट्सही घेतल्या आहेत. 17 धावांत 3 विकेट ही हार्दिकची आयपीएल सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे. या स्पर्धेत त्याने 10 अर्धशतकेही झळकावली आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube