बारावीतील सायन्स शाखेचे विद्यार्थीही सीए होऊ शकतात; देसरडा भंडारी प्रोफेशनल अकॅडमी व Learnaato.com यांच्या ऑनलाइन बॅचेस

CA-12वी नंतर सीए होण्यासाठी साधारण साडेचार वर्षांचा कालावधी लागतो आणि संपूर्ण अभ्यासक्रमाचा खर्च अंदाजे 85 हजार इतका येतो.

CA

CA

अहिल्यानगर: 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थीही सीए (CA) होऊ शकतात! हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे अगदी सत्य आहे. भारतामध्ये सीए अभ्यासक्रमाचे नियमन करणाऱ्या द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या नियमानुसार, बारावीची परीक्षा दिलेला कोणताही विद्यार्थी सीए अभ्यासक्रमासाठी पात्र असतो. म्हणजेच, विद्यार्थी वाणिज्य (Commerce) किंवा विज्ञान (Science) शाखेचा असला तरी तो सीए होऊ शकतो.

म्हणूनच नुकत्याच झालेल्या JEE, NEET किंवा CET परीक्षांमध्ये अपेक्षित गुण मिळाले नसतील, मनासारखी शाखा किंवा महाविद्यालय मिळत नसेल किंवा करिअरचा पर्याय बदलण्याचा विचार करत असाल, तर सीए हा तुमच्यासाठी एक उत्तम करिअर पर्याय ठरू शकतो.सीए होण्यासाठी विद्यार्थी अत्यंत हुशार असलाच पाहिजे, असे अजिबात नाही. मेहनत करण्याची तयारी, सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य मार्गदर्शन असेल तर कोणताही विद्यार्थी सीए होऊ शकतो.

सीए अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी बारावीमध्ये ठराविक टक्केवारीची कोणतीही अट नाही. तसेच या अभ्यासक्रमात कोणत्याही प्रकारचे आरक्षण (Reservation) किंवा कोटा (Quota) लागू नाही. बारावीची परीक्षा दिलेला कोणताही विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने सीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो.बारावीनंतर सीए होण्यासाठी साधारणपणे साडेचार वर्षांचा कालावधी लागतो. पुस्तकांसह संपूर्ण अभ्यासक्रमाचा खर्च अंदाजे ₹८५,००० इतका येतो. या प्रवासात CA Foundation, CA Intermediate आणि CA Final अशा तीन परीक्षा द्याव्या लागतात.

CA Foundation परीक्षेमध्ये चार विषय असतात. त्यापैकी एक विषय गणित (Mathematics) आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी JEE किंवा CET साठी CA Foundation मधील गणितापेक्षा अधिक उच्च स्तराचे गणित शिकलेले असल्यामुळे हा विषय त्यांच्यासाठी निश्चितच जमेची बाजू ठरतो. उर्वरित विषयांमध्ये Accounts, Economics आणि Law यांचा समावेश असतो. अहिल्यानगरमधील सीए कोचिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या Desarda Bhandari Professional Academy आणि Learnaato.com यांच्या संयुक्त विद्यमाने १ जुलैपासून फक्त विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन लाईव्ह बॅच सुरू होत आहे.

या बॅचमध्ये सीए संदीप देसरडा सर स्वतः विद्यार्थ्यांना Basic Accounts विषयाची स्वतंत्र तयारी करून घेणार आहेत. त्यामुळे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना Accounts विषयाची मजबूत पायाभरणी करता येईल. या बॅचचे डेमो सेशन २६ ते ३० जून दरम्यान, दररोज दुपारी ३ ते ५ या वेळेत YouTube Live द्वारे आयोजित करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 88888 54321 / 99756 51663

Exit mobile version