पुण्यात कामाच्या तणावामुळे सीए तरुणीचा मृत्यू; केंद्राचे चौकशीचे आदेश, अजितदादांनीही लक्ष वेधलं
CA Die work pressure : पुण्यातील ईवाई (EYE) या कंपनीत काम करणाऱ्या केरळच्या 26 वर्षीय तरुणीचा जीव गमवावाा लागला. ॲना सेबॅस्टियन पेरायल (Anna Sebastian Perayil) असे मृत तरुणीचे नाव असून ती पेशाने सीए होती. धक्कादायक म्हणजे नोकरीला लागून तिला केवळ चार महिने झाले होते. कंपनीतील कामाच्या प्रचंड दबावामुळे या तरुणीचा मृत्यू झाल्याचा दावा पीडितेच्या आईने केला आहे.
तरुण मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मुलीच्या मृत्यूमुळे आई अनीता ऑगस्टीन यांना मोठा धक्का बसला असून त्यांनी कंपनीचे प्रमुख राजीव मेमानी यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी कंपनीच्या कामाच्या ताणामुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. मात्र, याबाबत EYE कंपनीकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
हे पत्र व्हायरल झाल्यानंतर कंपनी विरोधात सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. कामगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी सांगितले की, अॅना यांच्या आईने केलेल्या आरोपांची आणि कंपनीतील शोषक कामाच्या वातावरणाच्या आरोपांची सखोल चौकशी सुरू असल्याचं सांगितलं. अॅना यांच्या दुःखद निधनामुळे खूप दुःख झालं. आम्ही त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ, असं करंदलाजे यांनी X वरी एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
Very saddened to hear about the death of a 26-year-old employee of EY in Pune. The rising cases of young people dying due to stress need our attention. I hope Ernst & Young India will take corrective steps.https://t.co/JADVq8kRkK
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 19, 2024
अजित पवारांनीही दिल्या सुचना
तर अजित पवारांनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, तणावामुळे तरुणांच्या मृत्यूच्या वाढत्या प्रकरणांकडे आपण लक्ष देणे आवश्यक आहे. अर्न्स्ट आणि यंग कंपनीला कामाच्या ठिकाणी तणाव दूर करण्यासाठी सुधारात्मक उपाय लागू करण्यास सांगितले आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाने, याबाबत तक्रार दाखल केली असून एना सेबॅस्टियन पेरायिल यांच्या मृत्यूच्या कारणांची चौकशी केली जाईल, असं कळवलं आहे.
दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा, विजय शिवतारेंशी खास कनेक्शन
कंपनीला लिहिलेल्या पत्रात काय?
दरम्यान, अॅना 2023 मध्ये CA परीक्षा उत्तीर्ण केली आणि मार्च 2024 मध्ये ईवायई पुणे या कंपनीत सामील झाली. तिची ही पहिलीच नोकरी होती. आपल्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तिने कठोर परिश्रम केले. पण, हे करत असतांना तिच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला, असं तिच्या आईने म्हटलं.
आईच्या म्हणण्यानुसार, नोकरीला लागल्यानंतर तिला चिंता सतावत होती. तणामुळं तिला झोप येत नव्हती. अनेक कर्मचाऱ्यांनी खूप काम दिल्यानं तिला राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे तिच्या टीमच्या बॉसने सांगितलं की, तिने तिथेच राहावं, आणि टीमसमध्ये सर्वांबाबत असलेलं मत बदलावं. मात्र, तरीही तिच्यावर कामाचा लोड होता. त्यामुळं ती मरण पावली.
माझ्या मुलीला न्याय हवा, तसेच इंडिया कंपनीत काही बदल करण्याची आवश्यकता असल्याचंही अॅनाच्या आईने नमुद केल.