Download App

बारामतीचे पार्सल परत पाठवा, विखेंनी रोहित पवारांना डिवचलं

अहमदनगर : आज राज्याच्या विद्यमान सरकारनं वेगळे (Devendrs Fadnavis)निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मागच्या अडीच वर्षाच्या काळातील आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi), हे सरकार होतं की नव्हतं अशी या सरकारची अवस्था होती. जिल्ह्यात तीन तीन मंत्री होते पण कोविड (Covid) काळात कोणताही मंत्री आम्हाला मदत करायला पुढं आला नाही. विकासाच्या नावाखाली फक्त गप्पा मारायच्या बोंबा मारायच्या पण जनतेच्या हातात काही देऊ शकले नाहीत, आपण सरकार फक्त कशावर पाहात होतो? मागचं सरकार फक्त फेसबूक लाईव्हवर (Facebbok Live) पाहात होतो. माझं कुटूंब तुमची जबाबदारी, हे घरात बसलेले आणि जबाबदारी तुम्ही घ्यायची, पण तसं आपलं सरकार नाही, त्याचवेळी केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कामांचं भूमिपूजन रोहित पवार करत असल्याची टीका जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil)यांनी केली आहे. आता कर्जत (Karjat)तालुक्यातील जनतेला हे बदलण्याची संधी आहे. येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये, जिल्हा परिषदा असतील नगरपालिका असतील यामध्ये हे बाहेरुन आलेलं पार्सल पुन्हा पाठवून द्यायची संधी तुमच्याकडं आलेली आहे. आपला स्वाभिमान जागृत ठेवण्याची गरज आहे, असंही यावेळी विखे पाटील म्हणाले. आज शेतकरी मेळावा आणि विविध विकासकामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं कर्जतमध्ये आले होते. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धडाडीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आज यांच्या सरकारला सात महिने झाले आहेत, ज्या गतीनं निर्णय घेतले जाताहेत, ज्या गतीनं लोकाभिमुख निर्णय घेतले जाताहेत, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत त्यांच्या सगळ्या मागण्यांचा विचार करत ट्वेंटी ट्वेंटीची मॅच आमच्या सरकारची सुरु आहे. मागचे अडीच वर्ष फेसबुकचं सरकार होतं. आता प्रत्यक्ष जनतेत जावून काम करणारं सरकार आपल्याला पाहायला मिळतंय हे आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्प वाचला. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका लोकाभिमुख अर्थसंकल्प आपल्याला पाहायला मिळाला नाही.

तीन वर्ष तुकाई बंद करण्याचं पाप केलं, राम शिंदेंनी रोहित पवारांना डिवचले

सगळ्या समाजाच्या, सगळ्या कष्टकऱ्यांच्या, सगळ्या लोकांची काळजी करण्याचं काम अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलंय की, जनतेच्या सूचना त्यासाठी मागवल्या. त्यावर 40 हजारांच्यावर लोकांनी सूचना केल्या आहेत. राज्याचं प्रतिबिंब आज या बजेटच्या निमित्तानं पाहायला मिळालं.

मला तर खरं देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करायचंय, धन्यवाद द्यायचंय की त्यांनी आपल्या जिल्ह्याला सुद्धा भरीव निधी देण्याचं काम केलंय. पहिलं आपल्या जिल्ह्यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलंय. धनगर समाजाच्या उत्कर्षासाठी सहकारी महामंडळ स्थापन करताना त्यासाठी 10 हजार कोटी रुपयांचा नवीन प्रकल्प सरकारनं मंजूर केला आहे.

एकामागून एक निर्णय होताहेत. लोकांना पाहिजे ते देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. पेयजल योजनेसाठी केंद्र सरकारच्या योजनांचं भूमीपूजन विरोधकांकडून केलं जात असल्याचा आरोप स्थानिक आमदार रोहित पवार यांच्यावर केला आहे. केंद्र सरकारचा पैसा आणि भूमिपूजन आमदार पवार करत आहेत.

आता कर्जत तालुक्यातील जनतेला हे बदलण्याची संधी आहे. येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये, जिल्हा परिषदा असतील नगरपालिका असतील यामध्ये हे बाहेरुन आलेलं पार्सल पुन्हा पाठवून द्यायची संधी तुमच्याकडं आलेली आहे. आपला स्वाभिमान जागृत ठेवण्याची गरज आहे.

आमदार राम शिंदे यांच्यासारखं सक्षम नेतृत्व आपल्या तालुक्याला मिळालं आहे. दिवसरात्र मेहनत करुन कर्जत-जामखेडचा कायाकल्प केलाय. आपण कुठेतरी चुकलो तीच आता ही चूक दुरुस्त करण्याची संधी आपल्याकडं आहे, असंही ते म्हणाले.

सरकार आपल्याला दोन्ही हातांनी द्यायला बसलेलं आहे. देवंद्र फडणवीस जनतेची नस-नस जाणून आहेत. आपल्याला काय हवंय? लोकांची मागणी काय आहे? या दृष्टीनं ते काम करताहेत. राज्याचं महसूलमंत्री म्हणून माझ्यावर जी जबाबदारी दिली. खरंतर आज सगळ्यात मोठा प्रश्न मोजणीचा होता, वर्ष झालं मोजणी होत नाही.

त्यामुळं भांडणं संपत नाहीत. म्हणून पथदर्शक प्रकल्प म्हणून आपण नगर जिल्ह्याची निवड केली, पुढच्या एक महिण्यामध्ये सगळ्या मोजण्या पूर्ण होतील आणि नकाशे आपल्या घरी पोहोच होतील, असा निर्णय आपण केलेला आहे, असंही यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

Tags

follow us