तीन वर्ष तुकाई बंद करण्याचं पाप केलं, राम शिंदेंनी रोहित पवारांना डिवचले
अहमनगर : मला वाटलं मतं कमी पडली तर चालू केलेल्या योजना सुरू राहतील. पण, तीन वर्ष तुकाई बंद करण्याचं पाप काही लोकांनी केलं, अशी घणाघाती टीका भाजप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांवर केली. कर्जतमध्ये आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा मेळावा आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात राम शिंदे (Ram Shinde) यांनी महाविकास आघाडी आणि रोहित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला.
यावेळी बोलतांना राम शिंदे म्हणाले, अनेक वर्षाचा प्रलंबित विकास फडणवीसांच्या कार्यकाळात पूर्ण झाला आहे. फडणवीसांनी आमची दुष्काळाची व्याख्य़ा बदलून टाकली. गेल्या ५ वर्षात कर्जत जामखेडला टॅंकर लागत नाही. हे केवळ शक्य झालं ते आपल्या फडणवीसांच्या दूरदृष्टीमुळे आणि त्याचं दायित्व त्यांनी माझ्यावर दिलं. मी कर्जत-जामखेड टॅंकरमुक्त केलं. फडवीसांच्या कार्यकाळात कर्जतमध्ये अनेक विकासाची कामं आणली. फडणवीसांनी मला मंत्री केलं. तेव्हा तुकाईचं काम प्रलंबित होतं. तुकाईच काम प्रलंबित आहे, हे फडणवीसांच्या कानावर घालताच त्यांनी त्यांनी तुकाईच्या कामाला मंजुरी दिली.
शिंदे म्हणाले, तुकाईच्या कामाला मंजुरी दिली. पण, पुढं काय झालं. तर पराभाव झाला. वाटलं होतं की, मतं कमी पडली तरी योजना चालू राहतील. पण, तीन वर्ष तुकाई बंद करण्याचा पापं केलं, अशी टीका शिंदे यांनी केली. दरम्यान, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येतात पुन्हा तुकाई सुरु झालं.
शिंदे म्हणाले, कुठं अंगणवाडीसेवकांचा मोर्चा निघाला, कुठं आशा सेविकांचा मोर्चा निघाला… खरंतर मोर्चा निघालाच नाही. नाही. मात्र, तरीही समाजातील सगळ्या घटकांना न्याय देण्याचं काम फडणवीसांनी अर्थसंकल्पात केलं. प्रत्येक माणूस हा विकासाच केंद्रबिंदू आहे. प्रत्येकाचा विकास झाला पाहिजे, या भूमिकेतून त्यांनी बजेटमध्ये सगळ्यांचा विचार करुन बजेड माडलं.
कर्जत-जामखेडमध्ये होत असलेल्या कामामुळे जनता भाजपच्या पाठिशी उभी आहे. आणि तेही कुठल्याही दबावाला बळी न पडता जनता भाजपची साथ देत आहे. जामखेडची पाणी योजनाही फडणवीसांनी मंजूर केली. मात्र, मधल्या काळात बंद झाली. त्यानंतर शिंदे सरकार येताच पुन्हा जामखेची पाणी योजना सुरू झाली, असं शिंदे म्हणाले.
नितीन गडकरींनी करून दाखवलं : चांदणी चौकातील पूल एक मे रोजी खुला होणार
दरम्यान, कॉंग्रेसचे प्रवीन घुले यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. एका निष्ठावान कार्यकर्ता कॉंग्रेसमध्ये आहे. पण, प्रवीण घुले यांनी पक्ष का सोडला. तेही ३० वर्षानंतर कॉंग्रेस सोडली. घुले हे दोन वर्ष या पक्षात, या पक्षातून त्या पक्षात जाणारे नाहीत. घुलेजी, आता तुम्ही भाजपचा अनुभव घ्या… तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येणार नाही… कुणाला भाजपमधून जायचं असेल तर लोक आम्हाला विचारून जातात. आज जे जामखेडमध्ये झाल, ते तुम्ही जाताच. अनेक कार्यकर्त्यांना भाजपात प्रवेश करायचा होता, पण त्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न झाला. भाजपला सोडून जायचं असतं, तेव्हा लोक आम्हाला विचारून जातात, अशा शब्दात शिंदेंनी पवारांना डिवचण्याचा प्रयत्नक केला.
दरम्यान, फडणवीस यांनी या कर्जत जामखेडला दुसरा आमदार दिला. नुसता आमदारच दिला नाही तर त्याच दिवशी सरकार घेऊन आला, त्यामुळे आता कर्जत-जामखेडचा आणखी विकास होईल, असं शिंदे म्हणाले.