नितीन गडकरींनी करून दाखवलं : चांदणी चौकातील पूल एक मे रोजी खुला होणार
पुणे : पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. चांदणी चौकातील (Chandni Chowk) वाहतूक कोंडींचा प्रश्न सोडवण्यासाठी सुरू असललेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्यात असतांना या पुलाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day) अर्थात, 1 मे ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग तंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी केली आले. ते आज पुण्याच्या दौऱ्यावर आले असतांना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
पाषाण, बावधन, मुळशी या सर्व भागातील वाहतूक ही चांदणी चौकात एकत्र येते. त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक वाहतूक कोंडी ही मोठी समस्या झाली होती. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय झाला होता. 2017 मध्ये नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे भूमीपूजन झाले होते.
दरम्यान, जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. हा पूल ऑगस्ट 2021 मध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र, तांत्रिक कारणांमुळे ठराविक वेळेत काम पूर्ण झाले नाही. पुलाचे काम रेंगाळल्यामुळे गडकरी यांनी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अनेकदा धारेवर धरले होते.
या पुलासाठीच्या भूसंपादनाचे काम रखडले होते. त्यात वाहतूक कोंडीमुळे काम करण्यात अडचणीत होत्या. या वाहतूक कोंडीचा फटका सीएम शिंदे यांना देखील बसला होता. त्यांच्यासमोर नागरिकांनी निदर्शने केल्यानंतर वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला होता. या पुलाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने निधी पुरवला होता. त्यातही अनेक कायदेशीर अडचणी आल्या होत्या. आता मात्र हे काम पूर्ण झाल्यामुळे नितीन गडकरी यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
हिंसा हाच हिंदू धर्माचा आधार, कालीचरण महाराजांचे परखड वक्तव्य
गडकरी यांनी आज पालखी मार्गाची हवाई पाहणी केल्यनंतर पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, चांदणी चौकाच्या उड्डाणपुलाचे काम पुण्यासाठी महत्वाचा विषय आहे. एक मे राजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची वेळ घेऊन या उड्डाणपुलाचे उद्घाटन करू, असे गडकरी यांनी सांगितले.
दरम्यान, गडकरी यांनी सांगितले की, रिंगरोड करण्यासाठी आम्ही तयार होतो. मात्र, त्यातील काही भाग हा राज्य सरकार करणार आहे, तर काही भाग आम्ही करत आहोत. हा रिंगरोड झाल्यानंतर पुण्यातील वाहतुकीचा भार कमी होईल, असं गडकरी म्हणाले.