Download App

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी भाजप नगरसेवकासह सात आरोपींना ठोकल्या बेड्या

Ahmednagar NCP Activist Killed : अहमदनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. त्यात आता पुन्हा एकदा मोठी घटना घडली आहे. शनिवारी 15 जुलैला शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्यावर प्राण घातक हल्ला झाला होता. त्यानंतर आज पहाटे त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. ( Seven accused arrested with BJP Activist in Ahmednagar NCP Activist Killed )

विधानभवन परिसरात विरोधकांनी घेतली प्रवीण दरेकरांची फिरकी

दरम्यान या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह 7 जणांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह अभिजित बुलाख, सुरज कांबळे, बिभ्या कांबळे, महेश कुर्‍हे, राजू फुलारी या मुख्य आरोपींना विदर्भातून ताब्यात घेतले. तसेच आणखी चार संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर व तांत्रिक पुराव्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपींचा शोध घेत त्यांना जेरबंद केले.

Duniyadari: ‘दुनियादारी’ला झाली १० वर्ष पूर्ण, ‘मैत्रीशी जुळलेलं नातं आजही कायम’…

काय आहे संपूर्ण घटना?

शनिवारी 15 जुलैला आदित्य गणेश औटी याचे काही मुलांशी भांडण झाल्याने अंकुश चत्तर हा मुलांचे भांडण सोडवण्यासाठी आला असता. त्याची हत्या करण्यात आली. यामध्ये भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे याने दिलेल्या चिथावणीवरुन अंकुश चत्तर यास मारण्यात आल्याचे बोलले जात आहे. यावेळी या 7 ते 8 आरोपी हे काळ्या रंगाच्या कारमधून येवून पुर्ववैमनस्यातून त्यांनी अंकुश चत्तर याला ठार मारण्यासाठी लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोप व गावठी कट्टा घेवुन जोराजोरात आरडा ओरडा व दहशत निर्माण केली. तसेच रस्त्याने येणारे जाणारे लोक व दुकानदार यांचेवर धाक निर्माण करुन अंकुश चत्तर याचे डोक्यात लोखंडी रॉडने मारुन गंभीर जखमी केले.

त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहुन आरोपींची ओळख पटवुन नगर शहर परिसरात शोध घेतला असता. आरोपी हे काळ्या रंगाची एमजी कंपनीचे कारमधून अहमदनगर, शेवगांव, पैठण, बिडकीन मार्गे वाशिमकडे जाताना दिसल्याने पथकाने वाशिम येथे जावून त्यांना ताब्यात घेतले. त्यात 1) स्वप्निल रोहिदास शिंदे वय 40, 2) अक्षय प्रल्हादराव हाके वय 33, 3) अभिजीत रमेश बुलाख वय 33, 4) महेश नारायण कु-हेवय 28, 5) सुरज ऊर्फ विकी राजन कांबळे वय 25 यांना ताब्यात घेतले आहे.

त्यानंतर राजंणी, बेल्हे, ता. जुन्नर येथे 6) मिथुन सुनिल धोत्रे वय 23 7) एक विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर यातील मुख्य आरोपी स्वप्निल शिंदे हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्या विरुद्ध खुन, जबरी चोरी, गंभीर दुखापत, सरकारी कामात अडथळा व इतर गंभीर स्वरुपाचे एकुण -7 गुन्हे दाखल आहेत.

Tags

follow us