Praveen Darekar यांचं मंत्रिपदासाठी वेटींग; पण विरोधकांचे ‘त्या’ जखमेवरच मीठ

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 07 17T140815.351

BJP Leader Praveen Darekar :  विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली. अनेकदा अधिवेशनाचा पाहिला दिवस हा विधानसभेतील घडामोडीसाठी चर्चेत असतो. सत्तारूढ आणि विरोधक हे पहिल्याच दिवशी राज्याच लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण आज विधिमंडळात पाहिला दिवस वादळी ठरला.

विषय हा विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या संदर्भातला होता. विरोधी पक्षाच्या सर्वच सदस्यांनी नीलम गोऱ्हे यांच्याविषयी अविश्वासाचा ठराव सभगृहात मांडला. सभापती असताना नीलम गोऱ्हे उघडपणे पक्षांतर कसं करू शकतात हा मुद्दा शेकपचे नेते जयंत पाटील यांनी उपस्थित केला. यानंतर सर्व विरोधक सभात्याग करत सभागृहाच्या बाहेर पडले.

चित्रपट सृष्टीच्या अडचणींची यादी घेऊन सुशांत शेलार पोहचला मुख्यमंत्र्याच्या भेटीला

यानंतर विरोधी पक्षातील सर्व नेत्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी सुरु केली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे सर्व आमदार एकत्र आले. त्याच वेळी भाजप नेते प्रवीण दरेकर हे वरंड्यात काही आमदारा सोबत गप्पा मारत होते. यावेळी विरोधी आमदार यांनी एक- एक येत प्रवीण दरेकर यांचे अभिनंदन करायला सुरवात केली.

विधानसभेत ऐतिहासिक क्षण! विरोधी पक्ष नेत्याची खुर्ची रिकामी तर माजी सहा चेहरे सत्ताधारी बाकावर

आमचे नवीन सभापती प्रवीण भाऊ आपलं अभिनंदन असं या अभिनंदनाचे स्वरुप होते. प्रवीण दरेकर म्हणाले तुम्ही ठरवून मला टार्गेट केल आहे. त्यावर अनेकांनी सांगितलं की, भाजपकडून सभापती पदासाठी तुमचे नाव आले आहे, अशी गुगली टाकली. त्यात एका आमदाराने गाणं गुणगुणायला सुरवात केली. “सहकार मंत्री होता होता, सभापती झाले” यावर जोरदार हशा पिकला.

दरम्यान, प्रवीण दरेकर यांचे नाव सहकार मंत्र्यासाठी चर्चेत होते. दरेकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात. पण ऐनवेळी अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाल्याने दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार खाते गेले आहे. त्यानंतर आता विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी दरेकरांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

Tags

follow us