Download App

सहकार, राजकीय क्षेत्रातील अतुलनीय व्यक्तिमत्व शंकरराव काळे यांचे मंगळवारी पुण्यस्मरण

प्रसिद्ध कीर्तनकार व सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे (आळंदी देवाची) अध्यक्ष संदिपान महाराज शिंदे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम.

  • Written By: Last Updated:

कोपरगाव: शिक्षण सेवेचा वसा घेवून रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य निस्वार्थ सेवेतून पुढे चालविणाऱ्या व सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजी खासदार स्वर्गीय कर्मवीर शंकरराव काळे (shankararo kale) यांचे बारावे पुण्यस्मरण आहे. निमित्त मंगळवारी (दि.०५) सकाळी नऊ वाजता पुष्पांजली कार्यक्रम होणार आहे.

कोपरगाव मतदारसंघातील एक कोटींच्या विकासकामांना मंजुरी : आ. आशुतोष काळे

तसेच सकाळी 10 ते 12 या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकार व सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे (आळंदी देवाची) अध्यक्ष संदिपान महाराज शिंदे (हसेगावकर) यांचा जाहीर हरी किर्तनाचा कार्यक्रम कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान येथे होणार आहे, अशी माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी दिली. या पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी माजी आमदार अशोकराव काळे, गौतम बँकेच्या माजी संचालिका, पुष्पाताई काळे, आमदार आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिक चैताली काळे तसेच कारखान्याचे व्हाइस चेअरमन, संचालक मंडळ, कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे सर्व सदस्य व विविध सलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

जोरदार शक्तिप्रदर्शन करत आशुतोष काळेंचा उमेदवारी अर्ज; रॅलीत आवतरला जनसागर

या पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी स्वर्गीय कर्मवीर शंकरराव काळे व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, उद्योग समूह व काळे परिवारावर प्रेम करणाऱ्या हितचिंतक तसेच रयत परिवाराने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे उपाध्यक्ष नारायणराव मांजरे यांनी केलेय.

आ. आशुतोष काळेंमुळे कोपरगावला अच्छे दिन, एमआयडीसी क्रांतिकारी निर्णय : काका कोयटे

follow us