“युवा नेत्याच्या हट्टापायी भिक्षुकांचा बळी गेला”, नामोल्लेख टाळत खा. लंके विखेंवर भडकले

जिल्हा रुग्णालयातील भिक्षेकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी खासदार निलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे यांच्यावर टीका केली आहे.

Nilesh Lanke and Sujay Vikhe

Nilesh Lanke and Sujay Vikhe

Nilesh Lanke on Sujay Vikhe : शिर्डी येथे भिक्षा मागून जगणाऱ्या ४९ भिक्षुकांना शिर्डी पोलिसांनी (Ahilyanagar News) ताब्यात घेऊन त्यांना विसापूर कारागृहात पाठवले होते. त्यातील १० भिक्षुकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते, त्यातील ४ भिक्षुकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, हे मृत्यू नसून हत्या आहे असा आरोप खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केला.

खासदार लंकेंनी उपचार घेत असलेल्या भिक्षुकांची जिल्हा रुग्णालयात भेट घेत त्यांची तब्बेतीची विचारपूस केली, त्याचबरोबर प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्न उपस्थित केले, या १० भिक्षुकांपैकी ३ जण रुग्णालयातून पळून गेले, या वेळी पोलीस आणि रुग्णालय प्रशासन काय करत होते, १० भिक्षुकांना रुग्णालयात आणल गेल त्यांना कारागृहात डांबून ठेवण्यात आले होते का ? असा प्रश्न देखील उपस्थित केला, तसेच मयत झालेल्या भिक्षुकांची इन कैमरा संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पोस्टमार्टम करून चौकशी करावी अशी मागणी या वेळी केली.

धक्कादायक! शिर्डीतील चार भिक्षुकांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू; नातेवाईकांचे प्रशासनावर गंभीर आरोप

नाव न घेता माजी खासदार सुजय विखेंवर निशाणा खासदार लंके म्हणाले एका युवा नेत्याच्या मागणीमुळे कधी नव्हे ती भिक्षुकांवर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले, ही प्रशासनाची चूक आहे. याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल यावेळी खासदार लंकेंनी उपस्थित केला. खासदार निलेश लंके यांच्या या टीकेवर आता माजी खासदार सुजय विखे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मागील महिन्यापासून शिर्डी येथील भिक्षुकी (बेघर) यांची पोलीस प्रशासनाकडून धरपकड सुरू आहे. त्यांना श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात दाखल करण्यात येते आहे. मागील चार दिवसांपूर्वी  शिर्डी येथून 49 भिक्षुकांना विसापूर येथील भिक्षेकरीगृहात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी (ता. 5) रोजी त्यांची वैद्यकीय तपासणी केली.

Shirdi Traffic Update : शिर्डीकरांसाठी महत्वाची बातमी…वाहतूक मार्गात झालाय बदल

Exit mobile version