Download App

अनिल पाटील थेट शरद पवार यांच्या रडारवर; खिंडीत गाठण्याचे राजकीय समीकरणे काय ?

  • Written By: Last Updated:

प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी)-शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या विधानांमुळे मदत पूनर्वसन मंत्री आणि अजितदादा यांचे कट्टर समर्थक अनिल भाईदास पाटील (Anil Patil) हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. अनिल पाटील हे पुढच्या विधानसभेत दिसणार नाही असा गर्भित इशारा खुद्द शरद पवार यांनी दिला आहे.
अनिल पाटील थेट पवार यांच्या रडारवर येण्याचे कारण काय? एकतर अजित पवार यांच्या दोन्ही बंडात म्हणजे पहाटेच्या शपथविधी आणि आता शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याच्या निर्णयामागे अनिल पाटील अग्रेसर होते. अनेक घडामोडीमध्ये अनिल पाटील हे पुढे होते. अजित पवार यांनी आपल्या पक्षासाठी मुख्य प्रतोद म्हणून ही जबाबदारी अनिल पाटील यांच्याकडे दिली आहे.

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच थांबणार, कारणे आहे तरी काय ?

पक्षाच्या वतीने अनिल पाटील यांनी शरद पवारांविषयी विधान देखील केले आहे. अनिल पाटील यांच्या विधानाचा शरद पवारांना राग आहेच.
अनिल पाटील यांचा अमळनेर मतदारसंघाचे चार ते पाच फॅक्टर काम करतात. एक मराठा मतदार हा ७० टक्के आहे. त्यांनतर ओबीसी व इतर समाज येतात. नगरपालिका माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्याकडे आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या, पंचायत समिती भाजपचे दिवंगत नेते उदय वाघ गट यांच्याकडे होती. त्यानंतर भाजपचे माजी आमदार बीएस पाटील आणि पारोळाचे आमदार चिमणराव पाटील हे ज्या पारड्यात एकत्र येऊन मतं टाकतील तो विजयी होतो.


लाठीचार्जनंतर जरांगे घरात जावून झोपले; टोपे अन् रोहित पवारांनी त्यांना मध्यरात्री उपोषणाला बसवले

यातील अनेक नेते हे गेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांच्या बाजूने उभे राहिले. शिरीष चौधरी निवडून आले. चौधरी आता नको म्हणून साहेबराव पाटील, उदय वाघ हे अनिल भाईदास पाटील यांच्या बाजूने उभे राहिले. गेल्या तीन निवडणुकीत हरलेले अनिल पाटील यावेळी निवडून आले. थेट मंत्री झाले.
आता बीएस पाटील शरद पवार गटात गेले. भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ विधानसभेच्या तयारीत आहेत. पारोळाचे आमदार चिमणराव पाटील यांचा मुलगा अमोल पाटील हे देखील अमळनेर ( स्वतःच्या तालुक्यातली २७ गावे असल्याने) ची चाचपणी करत आहे.

माजी आमदार साहेबराव पाटील ऐनवेळी शरद पवार गटात जायला तयार होतील. या फॅक्टरपैकी दोन जण अनिल पाटील यांच्यापासून दूर झाले तरी पाटील यांना निवडणूक कठीण आहे. माजी आमदार शिरीष चौधरी हे आज भाजपात दिसत असले तरी ऐनवेळी काही निर्णय घेऊ शकतील. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी माजी युवा अध्यक्ष उमेश पाटील यांनी पवार यांची सभा घेत शक्तीप्रदर्शन केले. त्यात राष्ट्रवादीच्या तिलोत्तमा पाटील या देखील स्पर्धेत आहेत.
सत्तेचे समीकरण आणि इच्छुक अनेक असले तरी प्रत्यक्ष पत्ते अजून कुठलाही राजकीय पक्ष आज उघडे करणार नाही, असे असले तरी अनिल पाटील यांची विधानसभेची वाट कठीण आहे हे मात्र नक्की.

Tags

follow us