देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच थांबणार, कारणे आहे तरी काय ?

  • Written By: Published:
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच थांबणार, कारणे आहे तरी काय ?

मुंबईः प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याच्या चर्चा असतात. त्यात ते पुणे, नागपूर, मुंबईतून लोकसभा (Loksabha Election) निवडणूक लढतील, अशा चर्चाही सुरू होतात. परंतु देवेंद्र फडणवीस यांनीच या चर्चांना आता पूर्णविराम दिला आहे. मी नागपूरातून विधानसभा निवडणूक लढणार आहे, हे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारासोबत अनौपचारिक गप्पामध्ये व्यक्त केले. या विधानाची सर्वत्र चर्चा होत आहे.

Devendra Fadanvis : मी त्यांचे भाषणच ऐकले नाही, भुजबळ-जरांगे वादावर बोलणे फडणवीसांनी टाळले

दिवाळीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्नेहमिलान कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अनेक प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आले. त्यात तुम्ही खासदार म्हणून दिल्लीला जाणार का? असा प्रश्न होता. त्यावर फडणवीस यांनी स्पष्ट खुलासा केला. याचे कारणही तसंच आहे. भाजपचे सर्व वरिष्ठ नेते खासदार निवडणूक लढवतील, असे संकेत केंद्रीय पक्षश्रेष्ठी यांनी दिल्याची चर्चा होती. यात फडणवीस, विनोद तावडे , गिरीश महाजन , सुधीर मुनगंटीवार यासारख्या वरिष्ठ नेत्यांची नावे कायम समोर होती. फडणवीस कधी गडकरी यांच्या जागेवर जातील, ते कधी पुण्यातून लढतील. ते उत्तर मुंबईत लोकसभा लढू शकतील, अशा अनेक शक्यता उपस्थित होत होत्या. त्याला फडणवीस यांनी पूर्णविराम दिला.

Ahmednagar News : आमचा फराळ गोड पण साखर विकतची, आमचे कारखाने नाही; शिंदेंचा विखेंना टोला

या विषयाच्या दोन बाजू समजून घेऊ. पहिली बाजू की राज्यात विधानसभा स्वतःच्या ताकदीवर नेतृत्व करू शकेल असा चेहरा सध्या भाजपकडे नाही. नेतृत्व, पैसा, योजना, वकृत्व या सगळ्याच बाबीत ते इतर सहयोगीपेक्षा फडणवीस उजवे आहेत. त्यामुळे भाजप त्यांच्याशिवाय विधानसभेचा विचार करू शकत नाही. ही बाब या विधानामागे असू शकते. त्याचबरोबर फडणवीस यांच्या पाठीशी असणारे पण सध्या शांत बसलेले अनेक नेते, आमदार यांना एक प्रत्यक्ष शाश्वती संदेश देखील या मार्गाने त्यांनी दिला.

दुसरी बाजू भाजपात मी हे करेल हे करणार नाही, असे ठामपणे कुणीही केंद्रीय नेतृत्वाला सांगू शकत नाही. हे सत्य नाकारून चालणार नाही. फडणवीस मुख्यमंत्री होतील हे सर्वजण सांगत होते. पण पक्षश्रेष्ठी यांनी त्यांना उपमुख्यमंत्री केले. त्यावेळी फडणवीस म्हणाले, मी सत्तेत सहभागी होणार नाही. त्यावेळी केंद्रीय नेतृत्वाने थेट उपमुख्यमंत्री पद घ्यावे लागेल, असे आदेश दिला. तो आदेश फडणवीस यांना पाळावा लागला. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेचे तिकीट मिळावे म्हणून जंगजंग पछाडले. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. नंतर पक्षश्रेष्ठींनी विधानपरिषद देऊन प्रदेशाध्यक्षपदही दिले.

त्यामुळे केंद्रीय नेतृत्व हा अंतिम शब्द आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे कोणी मी हे करेल, हे करणार नाही हे विधानाला काही अर्थ नाही. पाच राज्यात निवडणुकीनंतर अनेक समीकरणे हे देशभरात बदलणार आहेत. त्यामुळे हा नियम भाजपाला देखील लागू राहणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी एक स्पष्टीकरण देखील दिले आहे. महाराष्ट्रात राहून पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ते पार पाडेल हे विधानही अतिशय महत्वपूर्ण आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube