शेवगाव बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा

Shevgaon Market Committee Election : सध्या राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यातच नगर जिल्ह्यातील शेवगाव बाजार समितीचे निकाल समोर आले आहे. या निवडणुकीत आमदार घुलेंच्या पॅनलने 18 पैकी 18 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे. शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वच्या […]

Untitled Design   2023 04 30T202135.927

Untitled Design 2023 04 30T202135.927

Shevgaon Market Committee Election : सध्या राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यातच नगर जिल्ह्यातील शेवगाव बाजार समितीचे निकाल समोर आले आहे. या निवडणुकीत आमदार घुलेंच्या पॅनलने 18 पैकी 18 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे.

शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वच्या सर्व 18 जागांवर राष्ट्रवादी काँगेसने मोठ्या फरकाने विजय मिळवत बाजार समितीतील सत्ता कायम राखली आहे. या निवडणुकीत भाजपा आ. मोनिका राजळे यांनी मनसे, काँग्रेसला सोबत घेत एकत्र निवडणूक लढवली. मात्र त्याचा फारसा फरक जाणवला नाही.

शेवगाव बाजार समितीसाठी आज 18 जागेसाठी शांततेत सुमारे 98 टक्के मतदान झाले. मतदानानंतर तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. मतमोजणीमध्ये सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीने आघाडी कायम ठेवत सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवला.

शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुक
सेवा सोसायटी मतदासंघ –
कसाळ एकनाथ दिनकर -६३१
खंबरे गणेश बाबसाहेब -६२६
धस अशोक आण्णासाहेब ६२९
पटेल जमीर अब्बास,६१९
बेडके राहुल शंकर, ६३२
मडके अनिल बबनराव, ६२७
मडके नानासाहेब बबन,६१५

महिला राखीव –
कातकडे चंद्रकला श्रीकिसन, ६७९
लांडे रागिणी सुधाकर, ६८२

सर्वसाधारण प्रवर्ग – पातकळ हनुमान बापूराव, ६६४
सेवा सोसायटी विमुक्त जाती,भटक्या जमाती- दौंड राजेन्द्र शिवनाथ -६७९

ग्रामपंचायत मतदासंघ सर्वसाधारण –
कोळगे संजय मोहन,
मेरड अशोक रामभाऊ,
आर्थकदृष्टया दुर्बल घटक – अंधारे प्रिती रामभाऊ,
ग्रामपंचायत अनुसूचित जाती/जमाती प्रवर्ग- घाडगे अरुण भास्कर
व्यापारी मतदार संघ – तिवारी मनोज काशिनाथ, कुरेशी जाकिर शफी
हमाल मापडी मतदारसंघ – काळे प्रदीप नानासाहेब

Exit mobile version