Nashik : नाशिकमध्ये शिंदे व ठाकरे गटात राडा !

नाशिक: नाशिकमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने येऊन शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देवळाली गाव परिसरात काल सायंकाळी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या समर्थकात राडा होऊन शिंदे गटाचे पदाधिकारी सूर्यकांत लवटेंचा मुलगा स्वप्नील याने बंदूक काढत हवेत गोळीबार केल्यामुळे […]

_LetsUpp (2)

thakare shinde_LetsUpp

नाशिक: नाशिकमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने येऊन शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देवळाली गाव परिसरात काल सायंकाळी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या समर्थकात राडा होऊन शिंदे गटाचे पदाधिकारी सूर्यकांत लवटेंचा मुलगा स्वप्नील याने बंदूक काढत हवेत गोळीबार केल्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाला होता.

अध्यक्ष पदाच्या निवडीवरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात सुरुवातील राडा झाला होता, या दरम्यान शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचा मुलगा असलेल्या स्वप्नील लवटे याने राग आल्याने कमरेला लावलेली बंदूक काढून हवेत गोळीबार केला आहे.19 फेब्रुवारीला शासकीय शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी अध्यक्ष निवड केली जाणार होती. या दरम्यान हा गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी स्वप्नीलला ताब्यात घेतले असून उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version