Download App

साईचरणी नाण्यांचा खळखळाट…बँकेलाही सोसेना पैशांचा भार

Shirdi Saibaba Temple : करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दरवर्षी लाखो भाविक भेट देत दर्शनाचा लाभ घेत असतात. मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने साई चरणी जमा होणाऱ्या दानाची रक्कम देखील कोटींमध्ये असते. भाविक साई चरणी सोने- चांदी, रोख स्वरूपात रक्कम आदी वस्तू दान स्वरूपात देत असतात. मात्र रोकडसह जमा होणारी नाणी हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. साईचरणी वर्षाकाठी कोटी रुपयांची नाणी जमा होत आहे. यामुळे आता बँकांचे टेन्शन वाढू लागले आहे.

बँकेलाही सोसेना नाण्यांचा भार
साईचरणी जमा झालेल्या या कोट्यवधींच्या नाण्यांमुळे संस्थानच्या बँकांच्या समस्येत भर पडली आहे. प्रत्येक बँकेकडे सरासरी दीड ते दोन कोटींची नाणी साचू लागली असल्याने बँकांना जागा अपूरी पडू लागली आहे. नाणी बँकेत पडून असतात; मात्र त्यावर संस्थानला तसेच रक्कम बँकेत रोखीने ठेवल्याबद्दल आरबीआयला व्याज द्यावे लागते. नाण्यांवर प्रत्येक बँकेला वर्षाकाठी पंधरा ते वीस लाख रुपये खर्च येतो. नाण्यांसाठी कापडी पिशव्यांचा खर्चसुद्धा बँकांनाच करावा लागतो आहे.

मोठी बातमी ! ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतले

नाण्यांच्या वजनाने छत कोसळण्याची भीती
साई संस्थान मध्ये जमा होणारी देणगी ही काही ठराविक बँकांमध्ये जमा केली जात असते. यातच शिर्डीतील छत्रपती कॉम्प्लेक्समध्ये कॅनरा बँक पहिल्या मजल्यावर आहे. छतापर्यंत भरलेल्या त्यांच्या स्ट्राँगरूममध्ये किमान तीन ट्रक नाणी जमा असतील. त्यामुळे खालील दुकानदार यांनी नाण्यांच्या वजनाने छत कोसळण्याची भीती व्यक्त केली आहे. बँकांमधील नाण्यांची समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत., अशी माहिती साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली आहे.

Tags

follow us