मोठी बातमी ! ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतले
Nitin Deshmukh Sangharsh Yatra Stopped: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार देशमुख यांनी आपल्या जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेची स्थगिती उठवण्यासाठी संघर्ष यात्रा काढली आहे. आपल्या मतदारसंघातील नागरिकांना होणारा त्रास प्रशासनाला कळवा तसेच या सरकारला कळावा यासाठी पाण्याचा टँकर घेऊन ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या दिशेने वाटचाल करू लागले होते. आमदार देशमुखांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी अकोला ते नागपूर अशी पाणी संघर्ष पदयात्रा काढली होती. ही यात्रा नागपूरच्या वेशीवर धडकली होती. मात्र त्याच्यापूर्वी पोलिसांनी आमदार नितीन देशमुख यांना ताब्यात घेतेले आहे.
आमदार देशमुख यांची ही यात्रा आज नागपूरमध्ये दाखल होणार होती. मात्र, पोलिसांनी त्यांची संघर्ष यात्रा मध्येच अडवली. यावेळी उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी देशमुख यांना पोलिसांनी अक्षरश: फरफटत घेऊन जात पोलिसांच्या गाडीत बसवले असल्याची माहिती तेथील उपस्थितांनी दिली आहे. यात्रा रोखली मात्र आता आपण पाण्याचा टँकर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर नेऊन उभा करणार असल्याचा इशारा यावेळी आक्रमक झालेल्या देशमुख यांनी दिला आहे.
जनतेच्या समस्यांसाठी देशमुख आक्रमक
आमदार नितीन देशमुख यांनी आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या समस्येसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अकोला जिल्ह्यातील 50 हुन अधिक गावांना क्षारयुक्त पाण्याची समस्या भेडसावत आहे. हे पाणी नागरिकांच्या आरोग्यसाठी धोकादायक आहे. याबाबत प्रशासनाला कल्पना देण्यात आली होती. मात्र वारंवार सांगूनही सरकारकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे आढळून आले. यामुळे आमदार देशमुख यांनी स्वत: देवेंद्र फडणवीसांनी हे पाणी पिऊन दाखवावे असे आव्हान देत खाऱ्या पाण्याचा टँकर त्यांच्या घरासमोर उभा करण्याचे जाहीर केले होते.
उष्णतेची लाट…हवामान विभागाचा ‘या’ राज्यांना ‘हाय अलर्ट’
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख जल संघर्ष यात्रा घेऊन नागपूरच्या सीमेवर दाखल झाले आहेत. मात्र पोलिसांनी त्यांची संघर्ष यात्रा मध्येच अडवली आहे. आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.