MLA Lata Sonwane accident : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय नेत्यांच्या अपघातांच्या घटना सातत्याने घडत आहेत. आमदार योगेश कदम, आमदार बच्चू कडू, धनंजय मुंडे, जयकुमार गोरे आणि विनायक मेटे या नेत्यांसोबत अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर आज जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांच्या गाडीला डंपरने धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात मुले थोडक्यात बचावली आहेत. जळगाव तालुक्यातील चोपडा जळगाव रस्त्यावरील करंज गावाजवळ शनिवारी हा अपघात झाला.
आमदार लता सोनवणे आणि त्यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे हे चोपडा येथून जळगावला जात होते. चोपडा येथून जळगावकडे जात असताना जळगावहून चोपड्याकडे जाणाऱ्या डंपरने आमदार लता सोनवणे यांच्या इनोव्हा कारला धडक दिली. मुका मार लागल्याने दोघेही बचावले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी दोघांनी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
पालघरमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
दरम्यान, गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय नेत्यांचे अपघात झाले आहेत. यामध्ये दिवंगत नेते विनायक मेटे यांचा 14 ऑगस्ट 2022 रोजी अपघात झाला होता. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात विनायक मेटे यांचा मृत्यू झाला. जयकुमार गोरे यांचा 24 डिसेंबर 2022 रोजी अपघात झाला. आमदार जयकुमार गोरे हे पुण्याहून आपल्या मतदारसंघात चालले होते.
4 जानेवारी 2022 रोजी धनंजय मुंडे यांचा अपघात झाला होता. त्यानंतर योगेश कदम यांच्या गाडीला 6 जानेवारी 2022 रोजी अपघात झाला होता. काही दिवसांत लगेच 11 जानेवारी 2022 रोजी बच्चू कडू यांचा अपघात झाला होता.
‘आताचे दिवस आणीबाणीपेक्षाही वाईट’; केजरीवालांना पाठिंबा देत KCR मोदींवर बरसले
6 जानेवारी 2022 रोजी योगेश कदम यांच्या कारला अपघात झाला. योगेश कदम यांचा मुंबई-गोवा महामार्गावर रात्री 10.30 च्या सुमारास अपघात झाला होता. योगेश कदम दापोलीहून मुंबईच्या दिशेने येत होते.