Download App

Nilwande Dam : तनपुरे फक्त फ्लेक्स लावून श्रेय घेण्याचं काम करतात; कर्डिलेंचे टीकास्त्र

  • Written By: Last Updated:

Agmednagar News : गेल्या कित्येक वर्षापासून निळवंडेच्या पाण्यासाठी (Nilwande Dam) प्रतीक्षा संपुष्टात आल्यानंतर राहुरी तालुक्यात पाण्याच्या श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहेत. माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile), धनश्री विखे (Dhanashree Vikhe) यांनी राहुरीत निवळवंडे पाण्याचे जलपूजन केले. यावेळी त्यांनी आमदार प्राजक्त तनपुरेंवर (Prajakt Tanpure) टीकास्त्र डागलं. तनपुरे फक्त फ्लेक्स लावून श्रेय घेण्याचं काम करत आहेत, अशी टीका कर्डिलेंनी केली. कर्डिले आणि विखेंच्या जलपूजनानंतर आमदार प्राजक्त तनपुरे यांनीही कालव्यास भेट देत गुलाल उधळला.

कांद्याच्या प्रश्नासाठी खासदार विखे गृहमंत्र्यांच्या दारी, अमित शाह म्हणाले… 

राहुरी तालुक्यातील निंभेरे-कानडगाव परिसरात गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेले निळवंड धरण कालव्यांचे पाणी आज वाहू लागले. या पाण्याचे जलपूजन कर्डिले आणि खासदार विखे यांच्या पत्नी धनश्रीताई विखेंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नेहमीप्रमाणे कर्डिले यांनी आ. तनपुरेंवर तोफ डागत निळवंडे कालव्याच्या पाण्याचे श्रेय आमचेच असल्याच दावा केला. राज्यातील युती शासनाकडून आम्ही निधी आणतो व आ. तनपुरे हे फ्लेक्सबाजी करून श्रेय घेत असल्याची टिका कर्डिले यांनी केली.

काँग्रेसचीच गॅरंटी नाही अन् माझ्या गॅरंटीवर प्रश्न..,; PM मोदींची जहरी टीका 

तर धनश्री विखे म्हणाल्या की, राहुरीकरांची निळवंडेच्या पाण्याची प्रतिक्षा संपल्याचा आनंद आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खा.डॉ.सुजय विखे व माजी आमदार कर्डिले यांच्यामुळे राहुरीच्या पश्चिम पट्यातील जिरायत गावांना सुवर्णयोग लाभला. तनपुरे यांनी राज्यमंत्री असताना निळवंडेसाठी काहीच केले नाही. आता तनपुरे पिता पुत्र केवळ फ्लेक्सबाजीच्या माध्यमातून फुकटचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, आता तनपुरेंनी कालव्यास भेट दिली. यावेळी त्यांनी मविआच्या काळात तत्कालिन जलसंपदा मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्या पाठबळाने आणि माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या पाठपुराव्याने कोट्यवधी रूपयांचा निधी मिळाला होता. हा निधी मिळविल्यानंतर निळवंडे कालव्याच्या पाण्याचे स्वप्न साकार झाल्याचा दावा तनपुरे यांनी केला.

मविआने सर्वाधिक निधी दिला – तनपुरे
ते म्हणाले, निळवंडेचे पाणी तालुक्यात वाहताना मनस्वी आनंद होत आहे. महायुतीपेक्षा महाविकास आघाडी सरकारने सर्वाधिक निधी दिला. कोवीड काळातही निधीची कमतरता भासू दिली नाही. त्यामुळे निळवंडे कालव्याच्या कामाला मोठी गती मिळाली होती. आमदारकीच्या माध्यमातून निळवंडे कालव्यासाठी बहुमोल योगदान दिल्याचे सार्थक झाल्याचं तनपुरे म्हणाले.

यावेळी तनपुरेंनी राहुरी तालुक्यातील निंभेरे, तुळापूर या पश्चिम भागातील गावांना भेटी दिल्या. शेतकरी व महिलांकडून आ. तनपुरेंचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

follow us