Gulabrao Patil On Ajit Pawar : आज उद्यामध्ये मंत्रीमंडळाचा विस्तार होईल, मी त्यासाठीच थांबलो होतो, मात्र नाशिक येथी वणी गडावरील अपघाताची घटना घडली, त्यामुळे मला नाशिक यावं लागलं, त्याठिकाणाहून मी गावी आलो. आज दुपारपर्यंत किंवा सकाळपर्यंत मंत्री मंडळाचा विस्तार होईल असं मी ऐकतो आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्रात पॉवर गेम! राष्ट्रवादीवर टाकलेला डाव फडणवीसांवरच उलटणार
अजित पवार यांना अर्थ खातं मिळेल का असा प्रश्न विचारल्यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, “कुणाला काय खांत मिळेल हा निर्णय वरिष्ठ ठरवतील असं , मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. तिसरा भिडू आल्यामुळे खातेवाटपात थोडी गडबड होणार आहे, मात्र याचा अर्थ असा नाही की, खातेवाटपावरुन एकमेकांमध्ये नाराजी राहील. तसेच अर्थ खात्याच्या बाबतीतही वरिष्ठ जो निर्णय येतील तो सर्वांना मान्य असेल. त्यामुळे नुसत्या वावड्या उठवल्या जात आहेत, पण तसं काही नाहीये. तीन पार्टनर झाल्यामुळे थोडा विलंब होतोय, हे निश्चित.”
अजितदादांना अर्थखातं; गोगावले, शिरसाटांचा पत्ता कट : भाजपच्या बड्या नेत्याचे मोठे गौप्यस्फोट
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या वादग्रस्त टीकेवरदेखील भाष्य केले. अशा प्रकाराचा शब्द कोणी वापरु नये असं मला वाटतं. टीका – टिप्पणी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. कुणाला कशाही पद्धतीने बोलणे हे उचित नाही. मोठ्या तसेच वरिष्ठ नेत्यांनी बोलण्यामध्ये पथ्य पाळलं पाहिजे, आमच्या सारख्यांनी असं बोलल तर दुसरी गोष्ट आहे. आपण राज्याच्या नेत्यांनी असं बोलायला सुरुवात केली, तर खाली काय होईल ते आवरणं मुश्किल होऊन जाईल, असे गुलाबराव म्हणाले.