Download App

सुजय विखेंची साखर पेरणी थेट अण्णा हजारेपर्यंत, राजकीय चर्चांना उधान

Sujay Vikhe and Anna Hazare meet : नगर दक्षिणचे विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी आज राळेगणसिद्धी इथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुजय विखे यांनी अण्णा हजारे यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले. अण्णा हजारे आणि सुजय विखे यांच्या भेटीनंतर जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधान आले आहे. राजकीय विरोधक असलेल्या आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या मतदारसंघात जाऊन सुजय विखेंनी साखर पेरणी केलीय.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून आणि खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सर्वत्र साखर-डाळ शिदा गावोगावी नागरिकांना मोफत दिला जात आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिरराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यानिमित्ताने देशभर नागरिकांनी दिवाळीसारखा सण साजरा करावा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. त्या अनुषंगाने आपण नगर दक्षिणेचे खासदार या नात्याने संपूर्ण मतदारसंघात नागरिकांना मोफत साखर-डाळ शिदा वाटपाचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती खासदार सुजय विखे यांनी अण्णांना दिली.

Loksabha Election 2024 : ईशान्य मुंबईत पुन्हा संजय पाटील-मनोज कोटक भिडणार?

किटमध्ये साखर, डाळ, चालू वर्षाचे कॅलेंडर आदी गोष्टी आहेत. अण्णांनाही ही किट यावेळी देण्यात आली. आण्णा मी अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने माझ्या मतदारसंघातील नागरिकांना दिवाळीसारखा सोहळा साजरा करता यावा यासाठी साखर-डाळ शिदा भेट देत आहे, आपणही माझ्या मतदारसंघात असून माझे मतदार आहात त्यामुळे मी आपली भेट आणि आशीर्वाद घेण्यास आलो आहे, असे सुजय विखे यांनी सांगितले.

पुणे लोकसभा : फडणविसांनी कोणाकोणाला शब्द दिलेत….

या अनौपचारिक भेटीत अण्णा हजारे यांनी विखे परिवारातील पद्मश्री विठ्ठलराव विखे, पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या आठवणींना उजाळा दिला. विखे परिवाराला समाजकारणाची मोठी परंपरा असून पद्मश्री आणि पद्मविभूषण विखे यांनी अनेक विधायक कामे जनतेसाठी केली असल्याचे अण्णांनी यावेळी सांगितले.

follow us