Download App

Video : आता अयं…अयं..चालू द्या; मंचावरच विखेंनी निलेश लंकेंची नक्कल केली

आता काय फक्त भाषणंच ऐका अयं..अयं...चालू द्या, या शब्दांत माजी खासदार सुजय विखे पाटलांनी यांनी खासदार निलेश लंके यांची नक्कल केलीयं. ते वांबोरीत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

Sujay Vikhe Vs Nilesh Lanke : आता काय फक्त भाषणंच ऐका अयं..अयं…चालू द्या, या शब्दांत माजी खासदार सुजय विखे पाटलांनी (Sujay Vikhe Patil) खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांची नक्कल केलीयं. राहुरी विधानसभा मतदारसंघातील वांबोरी चारी प्रकल्प टप्पा 2 चे भूमिपूजन आज पार पडले. या भूमिपूजनासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्यासह भाजपचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संबोधित करताना सुजय विखे यांनी आपल्या पराभवाबद्दल भाष्य करताना खासदार निलेश लंके यांची नक्कल केलीयं.

सुजय विखे म्हणाले, पराभवानंतरही मी समाधानाने झोपू शकतो, कारण विरोधात मतदान टाकलं तरीही विरोधात मतदान टाकणारा म्हणतो की काम करुन दाखवावं ते सुजय विखेंनीचं. तुमच्या कार्याने समाजात तुम्हाला नाव करावं लागतं, आता काय फक्त भाषणं ऐका अयं अयं चालु द्या, असं म्हणत सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्या भाषणाची नक्कल केलीयं. तसचे आता योग्य डॉक्टर योग्य आजाराला मिळाला योग्य पेशंट मिळाले आता सर्वांनी आनंदाने पुढे जाऊ, या शब्दांत खोचक टीकाही विखे यांनी केलीयं.

अमरावतीत वातावरण चिघळलं; जमावाकडून पोलीस स्टेशनवर दगडफेक, 21 पोलीस झाले जखमी

मला राजकारणातून मुक्त केलंय, आज परिस्थिती अशी आलीयं की ,कोणाला कधी वाईट वाटेल याचं काही सांगता येत नाही. प्रत्येकाची आपापली महत्वकांक्षा होती पण दुर्देवाने विकास करणाऱ्या माणसाचा पराभव होत राहिला तर मागील 30 वर्षांपूर्वीचे दिवस पुढील 30 वर्षांत तुमच्या मुलांना पाहावे लागतील, जो माणूस तुमचयासाठी झटतो जात, पात, धर्म, सोडून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी चांगला नेता निवडून द्या, असं आवाहनदेखील सुजय विखे यांनी केलंय.

रिया चक्रवर्तीच्या अडचणीत पुन्हा वाढ, HIBOX घोटाळा प्रकरणी पोलिसांनी बजावली नोटीस

वांबोरीमध्ये आज माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते वांबोरी चारी प्रकल्प टप्पा 2 चे भूमिपूजन पार पडले. या प्रकल्पाबाबत बोलताना सुजय विखे म्हणाले, मुळा धरणात 14 टीएमसी पाणी असूनही पाणी उपसा होत नाही. पुढील काळात महायुतीचं सरकार आलं तर धरणांत 5 टीएमसी पाणी आलं तरीही पाणी उपसू हा शब्द मी देतो आहे. सध्या वांबोरीच्या प्रकल्पाला शंभर दशलक्ष फूट आरक्षित करण्यात आलंय, मुळा धरणातून अधिकच आरक्षण देण्याचं यावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून 14 कोटींची दुरुस्ती आवश्यक आहे या सर्व कामांसाठी आपण प्रयत्न करणार आहोत. माझ्या पराभवाने माझं नूकसान झालेलं नाही, तुम्ही निवडून दिलेल्या खासदारांने मी सांगितलेली कामे करुन दाखवावी, असं खुलं चॅलेंजही सुजय विखे यांनी लंके यांना केलंय.

follow us