Download App

पारनेर कॉलेजची स्वरांजली पुणे विद्यापीठात चमकली

  • Written By: Last Updated:

न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेरची विद्यार्थिनी स्वरांजली शिंदेंला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एमएसस्सी भौतिकशास्त्रासाठीचं गोल्ड मेडल जाहीर झालं आहे. एमएसस्सी 2021च्या बॅचमध्ये तिने भौतिकशास्त्र विषयात 89.50 टक्के गुणांची चमकदार कामगिरी करत विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या मानांकनात तिला अधिकृतपणे गोल्ड मेडलची मानकरी म्हणून घोषित करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या वर्धापनदिनी होणाऱ्या सोहळ्यात तिला गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात येणार आहे.

स्वरांजली शिंदे बीएसस्सी भौतिकशास्त्र विषयातही 88.50 टक्के गुणासह महाविद्यालयात प्रथम आली होती. तिने नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी मुंबई युनिव्हर्सिटी येथे प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून काम केले तसेच नुकतीच ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेशासाठीची पेट परीक्षाही उत्तीर्ण होऊन भौतिकशास्त्र विभागामध्ये संशोधनाचे काम करत आहे.

स्वरांजली ही पारनेर तालुक्यातील हंगा गावची रहिवासी आहे. तिच्या या यशाचं पंचक्रोशीत कौतुक होत आहे.या यशाबद्दल स्वरांजली हिचे माजी आमदार व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती व संस्थेचे सदस्य राहुल झावरे यांनी अभिनंदन केले आहे.

स्वरांजलीच्या यशात तिचे वडील जगदीश शिंदे, आई मंगल शिंदेंसह कॉलेजचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर उपप्राचार्य दिलीप ठुबें, भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. सुखदेव कदम, प्रा. विजया ढवळे, प्रा. रमेश खराडे, प्रा. निलेश पवार, प्रा. गणेश रेपाळे, प्रा.विशाल शेरकर, प्रा. महेश परजणे, प्रा. रोहन कोरडे, प्रा. प्रमोद मगर यांच्यासह सर्व प्राध्यापकांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं.

Tags

follow us