Download App

Satyajeet tambe : मला कोणत्याही पक्षात…, तांबेंची ‘त्या’ ऑडिओ क्लिपमध्ये भूमिका स्पष्ट

अहमदनगर : मला कोणत्याही पक्षात अडकायचं नसल्याचं नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमदेवार सत्यजित तांबे यांनी एका ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना स्पष्ट केलंय. तसेच मी वादळ शांत होण्याची वाट बघतोय, माझी भूमिक लवकरच मांडणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. सत्यजित तांबे आणि जळगावच्या एका मतदारामध्ये झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. या क्लिपमध्ये सत्यजित तांबे यांनी लवकरच माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

जळगाव मतदार संघातील मतदार सुनिल ठाकूर यांनी सत्यजित तांबे यांना संपर्क साधून आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केलीय. त्यावेळी तांबे यांनी आपण लवकरच भूमिका मांडणार असल्याचं सांगितलंय. दरम्यान, या क्लिपची सध्या सोशल मीडीयावर जोरदार चर्चा सुरु झाली असून या संभाषणात तांबे म्हणाले, मला काँग्रेसकडून एबी फॉर्म न मिळाल्याने मला अपक्ष निवडणूक लढवावी लागत आहे. त्यामुळे मला आता यापुढे पक्षीय राजकारणाच्या पलीकड जाऊन काम करायचं असल्याचं तांबेंनी स्पष्ट केलंय.

आता यापुढे मला कोणत्याही पक्षात अडकायचं नाही, पक्षीय राजकारणाच्या पलीकडच प्रश्न नेले पाहिजे असल्याचंही त्यांनी संभाषणात म्हंटलंय. येत्या 19, 20 जानेवारील मी माझी भूमिका स्पष्ट करणार असून एक दोन दिवसांत सर्व काही सुरळीत होणार असल्याचं तांबे म्हणालेत.

या क्लिपची सध्या सोशल मीडीयावर जोरदार चर्चा सुरु झाली असून अनेक नाशिक पदवीधर मतदारसंघात निवडणुकीचा अर्ज भरताना तांबे पिता-पुत्राकडून अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. उमेदवारी अर्ज नाकारुन आपल्या मुलाचा अपक्ष अर्ज भरल्याने काँग्रेसकडून सुधीर तांबे यांच्यावर चौकशी होईपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.

तर दुसरीकडे नाशिक मतदारसंघात निवडणुकीचं वातावरण तापल्याचं दिसून येतंय. सत्यजित तांबे यांच्या फॉलोवर्समध्ये या संपूर्ण घडामोडीनंतर एक प्रकारचा संभ्रम निर्माण झाल्याची परिस्थिती दिसून येतेयं. संभाषणात त्यांच्या जळगाव जिल्ह्यातील एका मतदाराकडून आपण लवकरात लवकर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केल्याचं दिसून येतंय.

दरम्यान, एकीकडे सत्यजित तांबेंना भाजपकडून पाठिंबा मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच तांबे यांनी आता पक्षीय राजकारणाच्या पलीकड जाऊन काम करायचं असल्याचं स्पष्ट केल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलंय. सध्या या ऑडिओ क्लिपची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु असून येत्या 19, 20 तारखेला सत्यजित तांबे नेमकी कोणती भूमिका घेणार? याकडं सर्वांचंच लक्ष लागलंय.

Tags

follow us