Download App

‘अपेक्षा न करता केलेली सेवा ही जिव्हाळा असतो; हाच जिव्हाळा कर्मवारी शंकरराव काळे यांनी जपला’

कर्मवीर शंकररावजी काळे हे आदर्श जीवन जगले. त्यांनी आपल्या जीवनात सत्तेपेक्षा जनसेवेला महत्व देवून सेवा करताना कोणताही हेतू ठेवला नाही.

  • Written By: Last Updated:

कोपरगाव: कर्माच्या शक्तीचा सदुपयोग केला तर आपल्याला परमात्मा स्वरूपाचे जीवन प्राप्त होते. कर्मवीर स्वर्गीय शंकरराव काळे यांचा जीवनपट पाहिल्यावर जनकराजाची आठवण होते. कर्मवीर शंकररावजी काळे हे आदर्श जीवन जगले. त्यांनी आपल्या जीवनात सत्तेपेक्षा जनसेवेला महत्व देवून सेवा करताना कोणताही हेतू ठेवला नाही. कोणतीही अपेक्षा न करता केलेली सेवा ही जिव्हाळा असते आणि हाच जिव्हाळा कर्मवीर शंकरराव काळे यांनी आयुष्यभर जपला. त्यांचे जीवनभक्ती आणि कर्माचा संगम असल्याचे प्रतिपादन ज्ञानसिंधू संदिपान महाराज शिंदे (Sandipan Shinde) (हसेगावकर) यांनी केले.

शिक्षण, सहकार, कृषी, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा अजोड ठसा उमटविणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक, माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या १२ व्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम झाला. कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानात आयोजित कीर्तनरूपी सेवेप्रसंगी ज्ञानसिंधू संदिपान महाराज शिंदे (हसेगावकर) बोलत होते.

संदिपान शिंदे म्हणाले, संत हे महाराष्ट्राचे वैभव आहे. काळे परिवाराकडे जनसेवेचा वारसा आहे. कर्मवीर शंकरराव काळे यांनी राजकीय जीवनात मिळालेल्या सत्तेतून जनतेची नितांत सेवा केली. शैक्षणिक, सामाजिक, कृषी, पाणीप्रश्न आदी क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान दिले. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याकडून कर्मवीर शंकरराव काळे यांना अमूल्य साधना मिळाली. त्या साधनेतून त्यांनी शिक्षण क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यानंतर अजोड कामगिरी केली. एका बाजूला कर्माची साधना तर दुसऱ्या बाजूला भक्तीची साधना असलेले कर्मवीर शंकरराव काळे एकमेव व्यक्तीमत्व होते.त्यांनी समाजाची सेवा करतांना कोणत्याही फळाची कधीच अपेक्षा केली नाही त्यामुळे त्यांचे जीवन हे निष्काम कर्मयोगी असल्याचे संदिपान महाराज शिंदे यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार अशोकराव काळे, आमदार आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे, डॉ. मेघना देशमुख, अॅड. प्रमोद जगताप, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन, उपाध्यक्ष नारायणराव मांजरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, ज्येष्ठ नेते छबुराव आव्हाड, सिकंदर पटेल, बाळासाहेब कदम, पद्माकांत कुदळे, एम.टी. रोहमारे, बाबुराव कोल्हे, विश्वासराव आहेर, ज्ञानदेव मांजरे, बाबासाहेब कोते, बाबुराव कोल्हे, संभाजीराव काळे, पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनराव काळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारूदत्त सिनगर, राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा वैशाली आभाळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

follow us