Download App

कसारा-इगतपूरी दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे डबे रुळावरून घसरले, वाहतूक ठप्प

  • Written By: Last Updated:

Nashik Train Accident : देशात सातत्याने रेल्वे अपघाताच्या (train accident) घटना घडत आहेत. आताही आणखी एक रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. इगतपुरीच्या दिशेने जाणारी मालगाडी रुळावरून घसरल्याने अपघात झाला आहे. या अपघातामुळं कसारा-इगतपुरी आणि नाशिककडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या थांबवण्यात आल्या असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे नाशिककडे जाणारे प्रवासी अडकून पडले आहेत. मात्र, या अपघाताचा मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम नाही.

कसारा-इगतपूरी दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे डबे रुळावरून घसरले, वाहतूक ठप्प 

हाती आलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी सात वाजून पंधारा मिनिटांच्या सुमारास कसारा-इगतपूरी दरम्यान मालगाडीचे सात डब रुळावरून घसरले. ही मालगाडी कल्याणहून कसारामार्गे नाशिकच्या दिशेने जात होती. कसारा स्थानकातून इगतपुरीच्या दिशेने जात असतांना पाचशे मीटर अंतरावर मालगाडी रुळावरून घसरली. त्यामुळं रेल्वे वाहतुकीस मोठा अडथळा आला आहे. नाशिक आणि कल्याण मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली सीएसएमटी हावडा, सीएसएमटी आदिलाबाद, नंदीग्राम एक्सप्रेस रखडल्या आहेत.

‘मराठा आरक्षणासाठी राजीनामा देईन’; जाळपोळनंतर प्रकाश सोळंकेंनी दिला शब्द 

रुळावरून डबे घसरल्याची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि इंजिनीअरिंग टीमचे सदस्य घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ट्रॅक मोकळा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, डबे हटवण्यासाठी किती वेळ लागले, हे सांगता येत नसल्यानं रेल्वे मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्याची शक्यता आहे. दरम्यान, या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा नुकसानीची माहिती समोर आली.

 

Tags

follow us