Download App

महायुती सरकार केवळ घोषणाबाज…आकडे कोटींची अन् कामे शून्य… तनपुरेंचा हल्लाबोल

Prajakt Tanpure : राज्यातील सत्तेवर असलेले महायुती सरकार नुसते घोषणाबाजी करणारे सरकार असून कामांवर कोट्यावधी रुपये खर्चाची आकडेवारी ही नुसती कागदावरच असून कामासाठी आकडे कोटीची पण कामे शून्य अशी अवस्था राज्यातील सत्तेवर असलेल्या सरकारची झाली असल्याची टिका माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी केली.

आमदार प्राजक्त तनपुरे हे आज १ कोटी ८५ लाख रुपये खर्च्याच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळ्या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.

आमदार प्राजक्त तनपुरे यावेळी म्हणाले की, राहुरी ताहाराबाद रस्त्याचे कामासाठी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अर्थ संकल्पात मंजूर झालेल्या ह्या कामास सरकार बदलून महायुतीचे सरकारने सत्तेवर येताच या कामाला स्थगिती दिलेली होती.ह्या सरकारच्या कामाना स्थगिती देण्याचे निर्णयविरुद्धात तालुक्यात सायकल फेरी काढून सुद्धा या रस्त्याला मंजुरी न देणाऱ्या सरकार विरोधात न्यायालयात दाद मागावी लागली. तिथे न्यायालयाने या कामावरील स्थगिती उठवताच हा कामाला प्रारंभ करण्यात आला.

Rohit Pawar : ‘शासन आपल्या दारी’चं नाटक बंद करा’; बीडमधून रोहित पवारांच घणाघात

राहुरी ते ताहाराबाद या रस्त्यासाठी १ कोटी ८५लाख रुपयाचा निधी मंजूर असून त्यातून ह्या रस्त्याचे काम होणार आहे. शासनाने या कामास स्थगिती दिली नसती तर वाढलेल्या ८ टक्के gst चा फायदा झाला असता. रस्त्याच्या कामाना शासन एकदाच निधी देत असते मिळालेल्या निधीचा योग्य तो वापर करून रस्त्याची कामे दर्जेदार करावी. असे सांगून राहुरी ते ताहाराबाद म्हैसगाव पर्यंतच्या रस्त्याचे काम मार्गी लावल्याचे माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

Dhangar Reservation : ‘लवकरच सकारात्मक कृती दिसेल’; राम शिंदेंचा उपोषणकर्त्यांना शब्द

विधानसभा निवडणुकीत या भागातील मतदारांनी माझ्यावर भरपूर प्रेम केलेले असून त्या सगळ्या प्रेमाच्या माणसांना मदत करणे मी क्रम प्राप्त समजतो म्हणून या पाच वर्षात याभागातील सर्वच रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. राहुरी ताहाराबाद रस्त्यावरील अंतिम टप्प्यातील काम अतिशय निकृष्ट झालेले असून त्या कामाची चौकशी केली जाईल, तसेच काही ठिकाणी काम सोडून दिले आहे व पुढे काम केलेले दिसते असे का शासन तर प्रत्येक किलोमीटर साठी पैसे देत असताना अर्धवट काम सोडण्याचा काय प्रकार आहे? असे त्यांनी विचारले. ठेकेदारांनी काम दर्जेदार करावे असे आवाहन केले.

Tags

follow us