Rohit Pawar : ‘शासन आपल्या दारी’चं नाटक बंद करा’; बीडमधून रोहित पवारांच घणाघात

Rohit Pawar : ‘शासन आपल्या दारी’चं नाटक बंद करा’; बीडमधून रोहित पवारांच घणाघात

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी आमदार पवार यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधला. बीड जिल्ह्यासह राज्यात दुष्काळ आहे अशा वेळी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे नेमके कुठे आहेत हे कुणालाच माहित नाही, अशी टीका आमदार पवार यांनी केली.

शासन आपल्या दारी हे नाटक सरकारनं बंद करून लोकांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. त्यानुसार उपाययोजना कराव्यात. आज शेतकऱ्यांसमोर इतक्या अडचणी उभ्या राहिलेल्या असताना कृषीमंत्री नेमके कुठे आहेत हे कुणालाच माहिती नाही. सुरुवातीला फक्त 40 तालुकेच दुष्काळाच्या यादीत घेतले होते. खरं तर संपूर्ण राज्याचा विचार होणे गरजेचे होते. सरकार गोंधळलेले आहे. सुरुवातीला जाहीर केलेल्या यादीत निकष वेगळे होते नंतर लोकांचा रोष वाढला म्हणून दुसरी यादी जाहीर केली जाते. या सरकारचं नेमकं चाललय हेच कळत नाही.

Rohit Pawar : तुम्ही मंत्रिपद खेळत राहा, लोकच तुम्हाला.. रोहित पवारांचा फडणवीसांना इशारा

शासन आपल्या दारीचं नाटक बंद करा 

शेतकऱ्यांना अजूनही विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. या गोष्टीचा विचार करून सरकारने आतातरी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. नाहीतर शेतकरी व्याजाने पैसे घेतील पण, नंतर या पैशांचा काय उपयोग असा सवाल करत आमदार रोहित पवार यांनी मंत्री मुंडे यांच्यावर निशाणा साधला. आशा सेविकांना जे पैसे जाहीर केले आहेत ते मिळत नाहीत. पेन्शन स्किमही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे सरकारने आता शासन आपल्या दारी हे नाटक बंद करावं आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत हे समजून घ्यावं. तसेच या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावेत, असे रोहित पवार म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube