Download App

नाशिक पदवीधरचा धक्का काँग्रेसला नाही, तर ठाकरेंना; मोठा नेता शिंदे गटात

  • Written By: Last Updated:

नाशिकः विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसलाय. नाशिकमधील माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात आज प्रवेश केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तनुजा या नाशिक पदवीधर मतदारसंघात शिंदे गटाच्या उमेदवार असणार आहेत. विधानपरिषद निवडणुकीत जागा वाटपावरून भाजप आणि शिंदे गटात वाद झाला होता. त्यामुळे नाशिकची जागा आता शिंदे गटाला देऊन घोलप यांना उमेदवारी देण्यात येणार आहे.

पाच विधानपरिषद जागांपैकी कोकण शिक्षक मतदारसंघातील आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा शिंदे गटाला मिळाली आहे. याचा अर्थ भाजप आता नाशिकमध्ये काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे यांच्या विरोधात आपला उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बबनराव घोलप हे शिवसेना फुटी नंतरही ठाकरे यांच्यासोबत होते; मात्र आता त्यांनी पवित्रा बदलला आहे. शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.

नाशिकची जागा शिंदे गटाला मिळावी यासाठी मंत्री दादा भुसे यांचा आग्रह होता. आता नाशिकमध्ये तांबे विरुद्ध घोलप अशी लढाई होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात भाजपची भिस्त ही काँग्रेसमधील फुटेवर होती. मात्र काँग्रेसमधील एक युवा नेता पक्ष सोडण्यास तयार न झाल्याने भाजपलाही ही जागा लढविण्यात रस राहिला नव्हता.

Tags

follow us