Satyajeet Tambe : राज्यातील एकही तालुका आणि गाव नाही, जिथं मी काँग्रेसचं काम केलं नाही, पण

नाशिक : “देशातील असं एकही राज्य नाही जिथं मी काँग्रेस पक्षाचं संघटनात्मक काम केलं नाही. राज्यातील एकही तालुका आणि गाव नाही, जिथं मी काँग्रेसचं संघटनात्मक काम केलं नाही.” असं वक्तव्य नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी केले आहे. नाशिक येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेसमधून बाहेर पडून सत्यजित तांबे यांनी स्वतः […]

'शिक्षण विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार…'; आमदार तांबेंचा खळबळजनक आरोप

Satyajeet Tambe

नाशिक : “देशातील असं एकही राज्य नाही जिथं मी काँग्रेस पक्षाचं संघटनात्मक काम केलं नाही. राज्यातील एकही तालुका आणि गाव नाही, जिथं मी काँग्रेसचं संघटनात्मक काम केलं नाही.” असं वक्तव्य नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी केले आहे. नाशिक येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

काँग्रेसमधून बाहेर पडून सत्यजित तांबे यांनी स्वतः अपक्ष म्हणून उभे राहिले आहेत. त्यांना शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी समर्थन दिले आहे. यावेळी बोलताना सत्यजित तांबे यांनी कपिल पाटील यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, “मी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे सर्व शिक्षक, पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्यावेळी आमच्या संपूर्ण परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं, तेव्हा कपिल पाटलांनी आम्हाला स्वतः फोन करून पाठिंबा दिला. अशा काळात कपिल पाटील आणि शिक्षक भारती आमच्या मदतीला धावून आली. हे मी कदापि विसरू शकणार नाही.”

सत्यजीत तांबे पुढे म्हणाले, “देशातील असं एकही राज्य नाही जिथं मी काँग्रेस पक्षाचं संघटनात्मक काम केलं नाही. राज्यातील एकही तालुका आणि गाव नाही, जिथं मी काँग्रेसचं संघटनात्मक काम केलं नाही. युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना चांद्यापासून बांद्यापर्यंत मी मित्र जमवण्याचं काम केलं. अनेक सामाजिक, राजकीय संस्था, संघटनांवरही मी काम करतो आहे. म्हणूनच कपिल पाटील यांच्या मनात मला पाठिंब्याचं गेल्या अनेक वर्षांपासून होतं.”

योग्य वेळी, योग्य रीतीने बोलेल

यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसमधील हकालपट्टी आणि राजकारण यावर बोलताना या सगळ्यावर योग्य वेळी आणि योग्य रीतीने बोलेल असा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “देशातील असं एकही राज्य नाही जिथं मी काँग्रेस पक्षाचं संघटनात्मक काम केलं नाही. राज्यातील एकही तालुका आणि गाव नाही, जिथं मी काँग्रेसचं संघटनात्मक काम केलं नाही. युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना चांद्यापासून बांद्यापर्यंत मी मित्र जमवण्याचं काम केलं. अनेक सामाजिक, राजकीय संस्था, संघटनांवरही मी काम करतो आहे. परंतू राजकारण असतं. ते किती असतं हे सर्वांनी मागील चार-पाच दिवसात टीव्हीवर पाहिलंच आहे. खूप राजकारण झालं आहे. आम्ही त्यावर योग्यवेळी योग्यरितीने बोलूच. सध्या मी राजकारणावर बोलणार नाही.” असंही सत्यजित तांबे यावेळी म्हणाले.

Exit mobile version