Download App

Ahmednagar Tomato Story : टोमॅटोने नगरच्या शेतकऱ्याला बनविले लखपती… दीड एकरात 40 लाखांचे उत्पादन

Ahmednagar Tomato Story : गेल्या अनेक दिवसांपासून टोमॅटोचे दर गगनाला भिडलेले आहेत. अक्षरशः टोमॅटोने 150 ते 200 रुपये किलो दर गाठला आहे. मात्र याच टोमॅटोने नगरमधील एका शेतकऱ्याला थेट लखपती केले आहे. अहमदनगरला भातोडी येथील शेतकऱ्याला दीड एकर टोमॅटोच्या शेतीतून दोन महिन्यात जवळपास 40 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. बबन धलपे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. धलपे हे गेल्या अनेक वर्षांपासून टोमॅटोचे उत्पन्न घेतोय, मात्र पहिल्यांदाच इतके विक्रमी उत्पन्न त्यांना मिळाले असल्याचे ते सांगतात. (Tomato makes Millionaire to farmer in Ahmednagar )

‘एमआयडीसी’च्या पत्राचा वाद चिघळला! शिंदेंनी अजितदादांचं नाव घेत रोहित पवारांना सुनावलं

आपण सध्या पहिले तर टोमॅटोमुळे लखपती आणि करोडपती झालेल्या शेतकऱ्यांच्या अनेक किस्से आपण ऐकले असतील. असाच काहीसा प्रकार नगर जिल्ह्यातील भातोडी गावात घडलेला आहे. टोमॅटोचे दर या हंगामामध्ये प्रचंड वाढल्याने टोमॅटोचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा झाल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे.

TYFC in TIFF 2023 : टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार भूमिच्या ‘थॅंक यू फॉर कमिंग’ चा वर्ल्ड प्रीमिअर

लाल टोमॅटोने धलपे कुटुंबीयांना केले मालामाल
बाजारभाव घसरल्याने रस्त्यावर टोमॅटो फेकुन देणारे शेतकरी आपण आजवर पहिले. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये टोमॅटोने बाजारात मोठी उसळी मारली आहे. नगर तालुक्यातील भातोडी येथील शेतकऱ्याने अवघ्या दिड महिन्यात टोमॅटोच्या कृपेने ४० लाखांचे उत्पन्न मिळवले. धलपे यांची एकुण ८ एकर शेती आहे. त्यापैकी दिड एकर शेतीवर त्यांनी टोमॅटोची लागवड केली. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून ते नियमित टोमॅटोची लागवड करीत आहेत.

यंदा त्यांच्या कष्टाचे चीज झाले असून त्यांना किलोला सरासरी 80 ते 100 रुपये भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे टोमॅटोसाठी लागवड, खत, औषध फवारणी, तारेचे कुंपण असा एकूण दोन ते अडीच लाखांचा खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षात त्यांनी एक रुपया दराने देखील टोमॅटोची विक्री केली आहे, तर अनेक वेळा त्यांना रस्त्यावरती फेकून द्यावे लागले. मात्र यंदाच्या वर्षी उच्चांकी दर मिळाल्याने समाधान व्यक्त केला आहे.

Tags

follow us