TYFC in TIFF 2023 : टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार भूमिच्या ‘थॅंक यू फॉर कमिंग’ चा वर्ल्ड प्रीमिअर

TYFC in TIFF 2023 : टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार भूमिच्या ‘थॅंक यू फॉर कमिंग’ चा वर्ल्ड प्रीमिअर

TYFC in TIFF 2023 : रिया कपूरच्या ‘वीरे दी वेडींग’ चित्रपटानंतर आता ‘थॅंक यू फॉर कमिंग’ या चित्रपटाची देखील चांगलीच चर्चा सुरू आहे. तसेच ‘वीरे दी वेडींग’ आणि ‘थॅंक यू फॉर कमिंग’ ची तुलना देखील होत आहे. कारण याही चित्रपटामध्ये पाच अभिनेत्रींची धम्माल पाहायला मिळणार आहे. तशीच ती ‘वीरे दी वेडींग’मध्ये करीना कपूर, सोनम कपूर आणि स्वरा भास्करची पाहायाला मिळाली होती. तसेट या चित्रपटाचा टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड प्रीमिअर होणार आहे. (Thank you for coming film world premier in Toronto International film festival )

मोदींच्या भाषणानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअर्ससाठी ‘सोनिया’चे दिन ; गुंतवणुकदार मालामाल

टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार वर्ल्ड प्रीमिअर…

‘थॅंक यू फॉर कमिंग’ या चित्रपटानबद्दल रिया कपूरने सोशल मीडियावर माहिती दिली. यावेळी तिने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली. ती म्हणजे या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे. त्यासाठी या चित्रपटाची निवड झाली आहे. या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत तिने ही माहिती दिली.

अमित शाहांवर कारवाई कराच! कलावती बांदूरकरांनी थेट PM मोदींनाच धाडले निवेदन

कोण-कोण भूमिका साकारणार?

या चित्रपटाच्या शेअर करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये शहनाज गिल, भूमि पेडणेकर, कुशा कपिला, डॉलि सिंह आणि शिबानी बेदी या पाच अभिनेत्री दिसत आहेत. त्यामुळे ही गर्ल गॅंग आता त्यांची कहानी सांगायला सज्ज झाली आहे. तर या पोस्टर आणखी एक गोष्ट चर्चेत आहे. ती म्हणजे एक अभिनेत्री यामध्ये टॉपलेस होत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

एक अभिनेत्री होतेय टॉपलेस…

या चित्रपटाच्या एका पोस्टरमध्ये एक अभिनेत्री यामध्ये टॉपलेस होत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. ती बॅकसाईडने या पोस्टरमध्ये एक अभिनेत्री यामध्ये टॉपलेस होत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे ही अभिनेत्री या पाच जणींपैकी कोण आहे ? हे गुलदस्त्यात आहे. दरम्यान ती भूमि असल्याचा अंदाज लावला जात आहे.

या चित्रपटात शहनाज गिल, भूमि पेडणेकर, कुशा कपिला, डॉलि सिंह आणि शिबानी बेदी या पाच जणींशिवाय डॉली आहलूवालिया, सुशांत गिवगिर, अनिल कपूर आणि करण कुंद्राही दिसणार आहे. त्यामुळे हा मल्टीस्टारर चित्रपट धुमाकूळ घालणार हे नक्की. या चित्रपटाचे दिग्दर्शन रिया कपूरचे पती करण बोलानीने केलं आहे. तर हा चित्रपट 6 ऑक्टोबरला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube