Trimbakeshwar News : नाशिक (Nashik)जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar temple )शनिवारी रात्री अन्य धर्मियांच्या एका जमावाने मंदिरात घुसखोरीचा केलेला प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. हे प्रकरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये मंदिरात जबरदस्तीने प्रवेश करण्याच्या प्रकाराची अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या (Additional Director General of Police)नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (Special Investigation Team)नेमून चौकशीला सुरुवात झाली असताना आज बुधवारी हिंदुत्ववादी संघटनांनी मंदिर शुद्धिकरण करुन आरती केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक (Maharashtra bandh) हिंदुत्ववादी संघटनांकडून (Hindu organizations)देण्यात आली आहे.
पुणे हादरलं! क्षुल्लक कारणावरुन टॅक्सीचालकानं आयटी अभियंत्याचा काढला काटा
काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. 13 मे ला गुलाब शहावली बाबांचा गावातून उरुस निघाल्यानंतर एका जमावाने मंदिरात धूप दाखवण्यासाठी घुसण्याचा प्रयत्न केला होता.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आज हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत मंदिर परिसरात गोमूत्र शिंपून शुद्धीकरण केले आहे. त्यानंतर साधू महंतांनी शुद्धीकरण मंत्रोच्चाराने मंदिर परिसराचे शुद्धीकरण करुन घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. त्याचवेळी धूप दाखवण्याची अशी कुठलीही परंपरा नसल्याचा दावा देखील यावेळी करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या प्रकारानंतर आज हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होऊन हिंदूंशिवाय इतर कोणालाही मंदिरात प्रवेश नाही. असा फलक असलेल्या ठिकाणचे अतिक्रमण देखील हटवण्यात आले आहे.
यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने काही वेळ मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. आरोपींवर गुन्हा दाखल झाला असता तरी त्यांना तात्काळ अटक न झाल्यास येत्या शुक्रवारी हिदुत्ववादी संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याचबरोबर पुढील 72 तासांमध्ये आरोपींवर कारवाई न झाल्यास राज्यातील सर्व मंदिर दोन दिवस बंद ठेवण्याचा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला आहे.